मुक्तपीठ टीम
महाविकास आघाडीच्या आक्रमकतेला आता भाजपाही आक्रमकतेनं उत्तर देत आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या ठोकशाहीला ठोकशाहीनं उत्तर या इशाऱ्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रकात पाटील यांनी सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत त्यांनी भाजपा पुढच्या नेत्यावर होणारा हल्ला थांबवायचा असेल, तर आपल्यालाही ‘रिअॅक्ट’ व्हावे लागेल. ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागणार असल्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
चंद्रकांत पाटलांचे कार्यकर्त्यांना मोलाचे उपदेश…
- ‘संघटना, विचारासाठी लढाई केली गेली पाहिजे.
- संघटना असेल तरच तुम्ही नगरसेवक, आमदार, मंत्री होऊ शकता.
- संघटना जीवंत आणि सशक्त असेल, तरच मनपा जिंकता येईल.
- तुमच्यापैकी किती जणांनी संघटनेसाठी काम केले आहे?
- ‘मनपात नगरसेवक व्हायचे, ‘स’ निधी मिळवायचा एवढेच स्वप्न बाळगू नका.
- आपण राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते आहोत याची जाणीव ठेवा.
- केवळ निवडणूक आली म्हणून खर्च करायचा असे धोरण नको.
- आताही नागरिकांसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करा.
- निधी नसल्यास पक्ष संघटनेशी संपर्क करा.
- ‘मनपातील आपल्या सत्ताकाळात भाजपाने उत्तम काम केले आहे.
- या कामाचा अहवाल घराघरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
- भाजपाच्या मनपात पाच वर्षांच्या कार्यकाळात भरीव काम केले आहे.
- पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकासकामांचे नियोजन केले आहे.
- ही कामे सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,’ असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.