Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटी कायद्याचे उल्लंघन, केंद्र सरकारकडून ७८ यूट्यूब न्यूज चॅनल्सवर कारवाई!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anurag Thakur

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७८ यूट्यूब न्यूज चॅनेल आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. आयटी कायदा २००० च्या कलम ६९-अ चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.

सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने गेल्या दोन वर्षांत ५६० यूट्यूब यूआरएल ब्लॉक केले आहेत. ब्लॉक केलेल्या यूट्यूब न्यूज चॅनेल्सवरील दर्शकांची संख्या ६८ कोटींपेक्षा जास्त होती. मंगळवारी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी ही माहिती दिली. तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील काँग्रेस खासदार मणिकम टागोर बी यांनी सरकारने बंद केलेल्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या संख्येचा तपशील मागितला होता.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यापूर्वीही अशीच कारवाई केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देखील १६ यूट्यूब चॅनल्स बंद करण्यात आल्या होत्या. यापैकी १० भारतीय चॅनेल आणि ६ यूट्यूब न्यूज चॅनेल पाकिस्तानमधून कार्यरत आहेत आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेमध्ये भारताची प्रतिमा खराब केल्याच्या आरोपामुळे ब्लॉक करण्यात आले होते. आयटी कायदा २०२१ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

५ एप्रिल रोजी करण्यात आली होती कारवाई

  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ५ एप्रिल रोजी आपत्कालीन शक्ती वापरून आयटी कायदा २०२१ अंतर्गत कारवाई केली होती.
  • या कारवाईत २२ यूट्यूब न्यूज चॅनेल, तीन ट्विटर अकाऊंट आणि एक फेसबुक अकाऊंटसह एक न्यूज वेबसाइटही बंद करण्यात आली.
  • या चॅनेल्सची व्ह्यूअरशिप २५० कोटींहून अधिक होती.
  • या चॅनल्सद्वारे भारतीय लष्कर आणि भारताचे परराष्ट्र संबंध अशा विषयांवर चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती.

Tags: anurag thakurcentral GovernmentIT ActMinistry of Information And BroadcastingyouTube News Channelsकेंद्र सरकारयूट्यूब न्यूज चॅनल्स
Previous Post

ओबीसी आरक्षण: बंठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका!

Next Post

अंमलीपदार्थांच्या आरोपीला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी काय आवश्यक? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले निकष

Next Post
supreme court

अंमलीपदार्थांच्या आरोपीला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी काय आवश्यक? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले निकष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!