Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंमलीपदार्थांच्या आरोपीला निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी काय आवश्यक? सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले निकष

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
supreme court

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाने अंमलीपदार्थविषयक एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई झालेल्या आरोपींना निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी निकष स्पष्ट केले आहेत. एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपी त्या गुन्ह्यात दोषी नाही, याला न्यायालयीन मान्यता मिळवण्यासाठी न्यायालयाला विश्वासार्ह तसेच स्वीकारता येतील असे पुरावे सादर करण्याची आवश्यकता आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार, एनडीपीएस आरोपी निर्दोष असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, संबंधित प्रकरणात अशी तथ्ये आणि परिस्थिती असणं आवश्यक आहे. तसं असलं तर न्यायालयाला खात्री पटेल की आरोपी असा गुन्हा करू शकत नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला जामीनाचे प्रकरण

अंमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपींना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले. जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने म्हटले होते की, एनडीपीएस कायद्याच्या कलम ६७ अन्वये नोंदवलेल्या कबुली जबाबाशिवाय आरोपींविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने मांडलेली भूमिका

  • अंमलीपदार्थविषयक नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टेन्स म्हणजेच एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपींच्या जामीनावरून उपस्थित निर्दोषत्वाच्या मुद्द्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
  • “एनडीपीएस कायद्याच्या तरतुदी ३७ च्या उप-कलम (१) च्या खंड (ब) मध्ये, ‘वाजवी आधार’ या शब्दाचा अर्थ विश्वासार्ह, स्वीकार्य वस्तुस्थिती असा आहे.
  • त्या वाजवी कारणांच्या आधारावर आरोपीने गुन्हा केलेला नाही असा न्यायालयाला विश्वास वाटू शकेल.
  • एनडीपीएस कायद्यातील कलम ३७ हे अंमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या जामीनाशी संबंधित आहे.

जामीन रद्द करत शरण येण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सुनावणीच्या या टप्प्यावर हे सांगणे योग्य नाही की प्रतिवादीने यशस्वीरित्या दाखवले आहे की या प्रकरणात त्याच्या निर्दोषतेसाठी वाजवी कारणं उपलब्ध आहेत. असे म्हणत न्यायालयाने उच्च न्यायालयाचा जामीन आदेश बाजूला ठेवत आरोपींना एनसीबीसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत.


Tags: Drug AccussedNDPS ACTSupreme Courtअंमलीपदार्थएनडीपीएस कायदासर्वोच्च न्यायालय
Previous Post

आयटी कायद्याचे उल्लंघन, केंद्र सरकारकडून ७८ यूट्यूब न्यूज चॅनल्सवर कारवाई!!

Next Post

केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात गुरुवारी राज्यभर काँग्रेसचे तीव्र आंदोलन !: नाना पटोले

Next Post
nana patole

केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीविरोधात गुरुवारी राज्यभर काँग्रेसचे तीव्र आंदोलन !: नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!