Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी, महाराष्ट्रानंतर राजस्थानात वृद्धाचा मृत्यू

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
2nd death from omicron

मुक्तपीठ टीम

राजस्थानच्या उदयपूरमध्ये ओमायक्रॉनमुळे ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. देशातील ओमायक्रॉनचा हा दुसरा बळी आहे. या नव्या विषाणू व्हेरिएंटने बाधिताचा पहिला मृत्यू महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू हा पोस्ट कोरोना निमोनियामुळे झाला आहे. या वृद्धाने कुठेही प्रवास केलेला नव्हता. तसंच २१ आणि २२ डिसेंबरच्या चाचणीत त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. २५ डिसेंबरला ते ओमायक्रॉनबाधित असल्याचं समोर आलं. त्यांना डायबेटिस, हायपरटेंशन आणि हायपोथॉयरोडिज्मच्या व्याधी होत्या, त्यासोबतच ते ओमायक्रॉनबाधित झाले आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

राजस्थानमध्ये आतापर्यंत ६९ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यातल्या ४७ जणांनी मात केलीय तर २२ जणांवर उपचार सुरु आहेत. ओमायक्रॉनबाधितांच्या यादीत राजस्थान हा देशात ५ व्या स्थानी आहे.

 

महाराष्ट्रात गेला होता पहिला ओमायक्रॉन बळी

महाराष्ट्रात गुरुवारी ५२ वर्षीय पुरुषाचा ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. ते २ आठवड्यांपूर्वी नायजेरियातून आले होते. त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. २८ डिसेंबरला त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर संशय आल्यामुळे त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले. यात त्यांचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉजिटिव्ह आला.

 

महाराष्ट्रातील ओमायक्रॉन स्थितीची माहिती

आज राज्यात १९८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत.

  • एन आय व्ही ने रिपोर्ट केलेल्या १९८ रुग्णांमध्ये ३० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.
    रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
  1. मुंबई – १९०
  2. ठाणे मनपा- ४
  3. सातारा, नादेंड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी १
  4. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका ५२ वर्षाच्या पुरुषाचे २८ डिसेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एन आय व्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
  5. आजपर्यंत राज्यात एकूण ४५० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
  6. यापैकी १२५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

Tags: MaharashtraOmicronRajasthanudaypurउदयपूरओमायक्रॉनमहाराष्ट्रराजस्थान
Previous Post

वाघांच्या १२१ मृत्यंपैकी ६० अभयारण्यांबाहेर अनैसर्गिकरीत्या! सरकार म्हणते व्याघ्र संवर्धन आणि इतर बाबी विसरु नका…

Next Post

सिंधुदुर्ग बँक जिंकली, आता पुढचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्ता! नारायण राणेंची घोषणा!!

Next Post
Narayan Rane assembly 31-12-21

सिंधुदुर्ग बँक जिंकली, आता पुढचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्ता! नारायण राणेंची घोषणा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!