मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर अनेक राज्यात आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. अनेक राज्याकडून ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आली आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सरकार उद्योग क्षेत्राशी चर्चा करीत आहे. विशेषतः स्टील प्लांट्स आणि ऑईल रिफायनरीजना कोरोना रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे.
… जेणेकरून कारखान्यांच्या उत्पादनावर परिणाम होणार नाही
या कारखान्यांच्या कामावर परिणाम होणार नाही याकडेही सरकारचे लक्ष आहे, त्यामुळे तेथे पडून असलेल्या अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी केली जात आहे. सरकारच्या वतीने औद्योगिक संस्था ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांशी बोलत आहेत. एका अंदाजानुसार सध्या देशात ७.२० अब्ज मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. यातील निम्मे रुग्णालयांसाठी तर अर्धे कारखान्यांसाठी आरक्षित आहेत.
रुग्णालयांना २०-२५ टक्के कोटा मिळेल
असे म्हटले जात आहे की सुरुवातीच्या टप्प्यात स्टील प्लॉट्स व रिफायनरीजचा कोट्यातून २० ते २५ टक्के ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येईल. सरकारच्या आवाहनाला स्टील प्लॉट्सनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तथापि, ऑक्सिजन देशाच्या एका भागापासून दुसऱ्या भागात नेण्याचे आव्हान आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील स्टील प्लांट्समधून ओडिसामध्ये ऑक्सिजनची वाहतूक करणे शक्य तितक्या लवकर होणार नाही.