Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्पर्शानं नाही श्वासातूनच पसरतो कोरोना संसर्ग, नव्या संशोधनातून दावा

September 6, 2026
in आरोग्य
0
corona

मुक्तपीठ टीम

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. शास्त्रज्ञ याबद्दल नवीन माहिती मिळण्याचा प्रयत्न सतत करत आहेत. जेव्हा पहिली लाट आली तेव्हा शास्त्रज्ञांनी म्हटले की संसर्गहबाधित व्यक्तीने एकदा वस्तूला स्पर्श केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने त्या वस्तूला स्पर्श केल्यास संसर्गाचा धोका होऊ शकतो. पण नव्या संशोधनानुसार, कोरोना स्पर्शातून नाहीतर श्वासातूनच पसरतो असा दावा करण्यात आला आहे.

अर्थात दहा हजार प्रकरणांमध्ये एका प्रकरणात संसर्ग होऊ शकतो, असेही सांगितल्याने स्पर्शातून संसर्गाचा धोका आहे तो आहेच.

 

संशोधनात काय सांगतं?

  • अमेरिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या संचालकांनी व्हाईट हाऊस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, एखाद्या वस्तूला स्पर्श करुन विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, वस्तूच्या स्पर्शाने संसर्ग होण्याचा धोका १०,००० लोकांपैकी केवळ १ आहे.
  • सीडीसीच्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या वाढीबरोबरच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
  • अशा परिस्थितीत वस्तूवर संक्रमणाचा धोका असतो. परंतु घर किंवा ऑफिसमध्ये वस्तूंच्या स्पर्शाने कोरोनाचा होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

संसर्ग पसरतो तरी कसा?

  • सीडीसीच्या अहवालात असे म्हटले आहे की हे नाकारता येत नाही की संसर्ग झालेल्या वस्तूला स्पर्श केल्यास धोका होऊ शकतो. परंतु त्याची शक्यता खूपच कमी आहे.
  • मात्र, कोरोनाचा विषाणू श्वासामार्फत अधिक पसरतो.
  • अहवालानुसार, कोरोना संसर्गबाधित व्यक्तीच्या नाका आणि तोंडातून फारच लहान थेंब हवेत पसरतात, जे इतरांना संसर्गित करतात. त्यामुळेच मास्क घाला आणि सुरक्षित राहा.
  • तज्ज्ञांच्या मते, दूषित किंवा संसर्गित भागाला स्पर्श केल्यामुळे कोणालाही कोरोनाचा धोका झाला आहे याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही.
  • असे असले तरीही, स्पर्शातून कोरोना संसर्ग पसरत नाही, यावर विश्वास ठेऊन निष्काळजीपणे वागू नका. १०हजारात एक का होईना प्रमाण आहेच आहे. त्यामुळे आपला परिसर, वस्तू बाधित होण्यापासून वाचवणे, स्वच्छ ठेवणे, हे अत्यावश्यकच आहे.

Tags: अमेरिकाकोरोनासेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन
Previous Post

ऑक्सिजनसाठी केंद्राचे प्रयत्न, स्टील कारखाने आणि रिफायनरीजवर जबाबदारी

Next Post

“साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीसमोर येणे महत्वाचे” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
uddhav

"साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीसमोर येणे महत्वाचे" - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!