Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“कोरोना योद्ध्यांसाठी सिडकोची घरे”

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

September 6, 2026
in सरकारी बातम्या
0
eknath shinde

मुक्तपीठ टीम

 

कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून सरकारी अधिकारी, पोलीस दलातील कर्मचारी व आरोग्य सेवेतील अधिकारी सेवा बजावत आहेत. या कोरोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सिडकोच्या माध्यमातून घरे राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली. सिडकोच्या नवी मुंबईतील तळोजा नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता “बुक माय सिडको होम योजना” जाहीर करण्यात आली असून या योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिका पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उपलब्ध आहेत.

 

या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ८४२ सदनिका, अल्प उत्पन्न गटातील १३८१ सदनिका आणि पोलिसांसाठी अल्प उत्पन्न गटातील १४८२ सदनिका उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदनिकांची किंमत १९.८४ लाख ते २१.५६ लाख रुपये, तर अल्प उत्पन्न गटातील सदनिकांची किंमत २७.९४ लाख ते ३१.४३ लाख रुपये इतकी असणार आहे. या योजनेत आरोग्यसेवा संबंधित कर्मचाऱ्यांसह जिल्हा प्रशासन, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी इत्यादींचा समावेश असणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

 

कोरोनाकाळात या सर्व घटकांनी अतुलनीय सेवा बजावली आहे. काहींना प्रसंगी जीवही गमवावा लागला आहे. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन तिचा योग्य सन्मान केला पाहिजे, या भावनेने राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून या कोरोना योद्ध्यांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. कोरोना महामारीत कोरोना योद्ध्याचा आकस्मिक मृत्यू झाला असल्यास त्याची पती/पत्नी अथवा वारसासही या घरांचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांस सक्षम प्राधिकरणाकडून कोरोना योद्ध्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

 


Tags: Urban Development Minister Eknath Shindeकोरोनानगरविकासमंत्री एकनाथ शिंदेपंतप्रधान आवास योजनाबुक माय सिडको होम योजनासिडकोची घरे
Previous Post

महाराष्ट्रातील नवे ब्रेक दि चेन’ निर्बंध, समजून घ्या ए टू झेड…

Next Post

ऑक्सिजनसाठी केंद्राचे प्रयत्न, स्टील कारखाने आणि रिफायनरीजवर जबाबदारी

Next Post
oxygen

ऑक्सिजनसाठी केंद्राचे प्रयत्न, स्टील कारखाने आणि रिफायनरीजवर जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!