Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

DHFL प्रकरण: ३४ हजार कोटींच्या बँक घोटाळ्यात वाधवानांसह ७४जणांविरोधात आरोप पत्र!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
CBI Kapil Wadhwan

मुक्तपीठ टीम

सीबीआयने शनिवारी ३४ हजार ६१५ कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या बँक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने डीएचएफएलचे माजी सीएमडी कपिल वाधवन आणि इतर ७४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सीबीआयने तत्कालीन संचालक धीरज वाधवन आणि माजी सीईओ हर्षिल मेहता यांनाही या घोटाळ्यात आरोपी केले आहे.

डीएचएफएल बँक घोटाळा प्रकरणात चौकशी सीबीआयने जूनमध्ये १७ बँकांच्या एका समूहाची ३४ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला होता, ज्यामुळे देशातील सर्वात मोठी बँकिंग कर्ज घोटाळा प्रकरण बनले आहे. आरोपपत्रात सीबीआयने १८ व्यक्ती आणि ५७ कंपन्यांची नावे दिली आहेत ज्यांच्यामार्फत पैशांचा व्यवहार झाला.

अधिवक्ता अजय वझिरानी, ​​व्यापारी अजय नावंदर, अनेक चार्टर्ड अकाउंटंट, डीएचएफएलचे माजी अधिकारी आणि इतर संबंधित कंपन्यांची आरोपपत्रात नावे आहे. २०१० ते २०१८ दरम्यान DHFL ला ४२ हजार ८७१ कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा देणार्‍या १७ बँकांच्या समूहाचे प्रमुख असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून सीबीआयने वाधवन आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. कपिल आणि धीरज वाधवन यांच्यासह इतरांनी गुन्हेगारी कटात तथ्ये चुकीची मांडल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. तथ्य लपवून फसवणूक केली गेली. कंपनीने जनतेच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

काय आहे प्रकरण?

  • डीएचएफएलचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
  • या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून १४ हजार ०४६ कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली.
  • ज्यांच्या नावाने खाती काढण्यात आली होती, त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते.
  • या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आलं.
  • कपिल वाधवान आणि धीरज वाधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत.
  • आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून १ हजार ८८७कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Tags: Bank ScamCBIDHFL CaseDHFL प्रकरणDhiraj WadhvanKapi Wadhvanकपिल वाधवानधीरज वाधवानबॅक घोटाळासीबीआय
Previous Post

शिंदे गटाला भाजपाचे धक्क्यावर धक्के: अंधेरी मतदारसंघानंतर जव्हारमध्ये अख्खं पॅनलच घेतलं!

Next Post

भाजपातच असंतोष: उपऱ्यांचे लाड, निष्ठावंत वाऱ्यावर! जनसंघाकडे वळण्याचा इशारा!!

Next Post
BJP Sangli

भाजपातच असंतोष: उपऱ्यांचे लाड, निष्ठावंत वाऱ्यावर! जनसंघाकडे वळण्याचा इशारा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!