Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भोंगा, चौरंग आणि बरंच काही! औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा, तर सांगलीत जुनं वॉरंट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray

मुक्तपीठ टीम

औरंगाबाद सभेप्रकरणी अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली जिल्ह्यातील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. २००८च्या एका जुन्या प्रकरणात हे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.

 

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेत मशिदींवरील भोंग्याप्रकरणी आक्रमक भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी मशिदींवरील भोंगे काढली नाहीत तर…याबद्दल चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप आहे. तसेच सभेत जर कोणी गडबड केली तर चौरंग करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकली. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ११६, ११७ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे नेत्यांना पोलिसांकडून नोटीस

  • राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत.
  • राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे.
  • त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत.
  • मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.

राज ठाकरेंना सांगली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी!

  • राज ठाकरे यांच्याविरोधात सांगली शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
  • राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या अजामिनपत्राचे वॉरंट हे वर्ष २००८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गु्न्ह्यातील आहे.
  • राज यांच्याविरोधात भारतीय दंड विधान १०९,११७,१४३ आणि मुंबई पोलीस कायदा १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • सांगली कोर्टाने या प्रकरणी थेट मुंबई पोलीस आयुक्तांना राज ठाकरे यांना सांगली कोर्टात अटक करून हजर राहण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे.
  • सांगलीतील मनसे कार्यकर्ता तानाजी सावंत यांनी मराठी पाट्या आणि मराठीच्या मुद्यावर आंदोलन केले होते.
  • यावेळी काही दुकाने बळजबरी बंद करण्याचा प्रयत्न केला होता.
  • त्यानंतर तानाजी सावंत यांच्यासह पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा खटला निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Tags: AurangabadCity Chowk Police StationmnsRaj Thackerayऔरंगाबादमनसेराज ठाकरेसिटी चौक पोलीस ठाणे
Previous Post

चंदिगडमध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांच्या सल्लागारांना खासदार किरण खेरांनी सुनावलं…

Next Post

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक, पोलीस गंभीर जखमी

Next Post
Gadchiroli Police

गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी चकमक, पोलीस गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!