Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंदिगडमध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांच्या सल्लागारांना खासदार किरण खेरांनी सुनावलं…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Banwari lala Purohit and Kiron Kher

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र, बंगालमध्ये गाजणारा राज्यपाल विरुद्ध सरकार म्हणजे लोकप्रतिनिधी वाद आता चंदिगडमध्येही पोहचला आहे. पंजाबचे राज्यपाल आणि चंदिगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांचे सल्लागार आणि प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींना महत्वच देत नाहीत, अशी तक्रार आहे. भाजपाच्या स्थानिक खासदार किरण खेर यांना एका महत्वाच्या कार्यक्रमाचं निमंत्रणच नव्हतं. त्या तिथं गेल्या आणि त्यांनी सर्वांनाच प्रोटोकॉलपासून सर्वच मुद्द्यांवर सुनावलं!

खासदारांनाच विसरले प्रशासन…

  • सोमवारी चंदीगड प्रशासनाने शहरातील सेक्टर-१० येथील विविध विभागांच्या ८६ सेवा ऑनलाइन करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
  • या कार्यक्रमाला खासदार किरण खेर यांना निमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
  • कार्यक्रमाला पोहोचलेल्या खासदार किरण खेर यांनी संताप व्यक्त करत म्हणाल्या की, मी चंदीगडहून उपचारासाठी गेले तर अधिकारी मला विसरले.
  • असे करू नका, दु:ख होते. आता मी परत आले आहे, मी आता तुम्हाला भेटत राहीन जेणेकरून तुम्ही मला विसरणार.

नगरसेवकांनी केली प्रशासनाची तक्रार

  • खासदार किरण खेर जेव्हा चंदीगडला पोहोचल्या तेव्हा सेक्टर-३३ कार्यालयातील भाजपा नगरसेवकांनी त्यांना सांगितले की अधिकारी त्यांचे ऐकत नाहीत.
  • महापालिकेत एकदा चर्चा झाली तरी प्रशासनाकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही मिळत नाहीत.
  • आता सोमवारी प्रशासकीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी खासदारांना निमंत्रण पत्र पाठवले नाही.
  • खासदाराच्या नाराजीनंतर अधिकार्‍यांनी त्यांना कार्यक्रमाला बोलावले पण त्या पोहोचल्यावर कोणीही त्यांना घ्यायला गेले नाही.
  • खासदार आतमध्ये पोहोचताच त्यांनी प्रशासकाचे सल्लागार आणि डीसी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली.

 

नाराजीनंतरही प्रोटोकॉलचा भंग!

कार्यक्रमानंतर सर्वजण निघू लागताच चंदिगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहितांच्या पाठोपाठ सल्लागारांची गाडी लावण्यात आली.
प्रोटोकॉलनुसार खासदारांची गाडी तिथे लावायला हवी होती, असे सांगत किरण खेर यांनी सल्लागाराला गंमतीने सांगितले की, आता व्यवस्था बदललेली दिसते.


Tags: Chandigarhकिरण खेरचंदिगडराज्यपाल बनवारीलाल पुरोहित
Previous Post

राहुल गांधी मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळमध्ये! भाजपाची नाइटक्लब पार्टीवर टीका, काँग्रेसचं प्रत्युत्तर!!

Next Post

भोंगा, चौरंग आणि बरंच काही! औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा, तर सांगलीत जुनं वॉरंट!

Next Post
Raj Thackeray

भोंगा, चौरंग आणि बरंच काही! औरंगाबादमध्ये राज ठाकरेंवर गुन्हा, तर सांगलीत जुनं वॉरंट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!