Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कल्याणमधील शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी भाईगिरी भोवली!

मनसे आमदाराच्या आंदोलनामुळे शिवसेना माजी नगरसेवकावर गुन्हा

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
raju patl

मुक्तपीठ टीम

कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात गुरुवारी एका शेतकरी कुटुंबावर जमिनीसाठी हल्ला करण्यात आला होता. या शेतकरी कुटुंबाच्या न्यायासाठी मारहाण करण्याऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मनसे आमदार राजू पाटील प्रयत्न करत होते. अखेर ५ दिवसानंतर शीळ-डायघर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, डोंबिवलीमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांतील मोकाशी पाडा, दहीसर आणि दहिसर मोरी या तीन गावांमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची २८५ एकर शेती आहे.
  • .+या शेतीवर विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत.
  • या महत्वाच्या जागेवर सर्व बिल्डरांचा डोळा आहे.
  • मागच्या गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास चार ते पाच वाहनांतून काही जण लाठ्याकाठ्या घेऊन आले आणि मोकाशी पाड्यातील माजी पोलीस पाटील एकनाथ मोकाशी आणि त्यांचा मुलगा प्रशांत मोकाशी याला मारहाण केली.
  • इतकेच नव्हे तर महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
  • यात एकनाथ मोकाशी यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे.
  • तर प्रशांत मोकाशी याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
  • याबाबत वैद्यकीय तपासणी प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा पोलिसांनी गुन्हा केला नव्हता.
  • याप्रकरणी शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
  • शेतकरी कुटुंबीयांसोबत जवळपास ६ तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला.
  • पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.
  • यावेळी मनसे आमदार यांनी पोलीस गुन्हा दाखल करत नाही तर पीडित कुटुंब न्यायालयात धाव घेणार असे सांगितले होते.
  • अखेर ५ दिवसानंतर का होईना डायघर पोलिसांनी शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाणे येथील डायघर पो.स्टे. हद्दीत एका शेतकरी कुटूंबाला मारहाण झाली तरीही पोलिस FIR दाखल करत नाहीत ! का तर तो आरोपी सेनेचा पदाधिकारी आहे म्हणून ? हा महाराष्ट्र आहे की बिहार ? @maha_governor @DGPMaharashtra @Dwalsepatil @AjitPawarSpeaks @OfficeofUT pic.twitter.com/ZPVE9Dqtnv

— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) February 5, 2022

कुटुंबियांनी राजू पाटलांचे मानले आभार

  • शीळ-डायघर पोलिसांनी डोंबिवलीमधील शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह १५ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
  • हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकरी एकनाथ मोकाशींलह पोलीस ठाण्यात भेट दिली.
  • कुटुंबियांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना धन्यवाद देत पोलिसांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली आहे.

Tags: DombiwalimanseRaju PatilRamesh MhatreShivsenaडोंबिवलीमनसेरमेश म्हात्रेराजू पाटीलशिवसेना
Previous Post

“गुजरातमध्ये कोरोना मृत्यू १०हजार, मदत मात्र ८२ हजारांना! एक लाखावर अर्ज!”

Next Post

राष्ट्रवादीचा भाजपावर ट्वीट हल्ला: “चुनावजीवी…थापांची पुडी सोडूया!”

Next Post
ncp attack bjp on twitter as chunavjeevi

राष्ट्रवादीचा भाजपावर ट्वीट हल्ला: "चुनावजीवी...थापांची पुडी सोडूया!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!