मुक्तपीठ टीम
देशात सुरू असणाऱ्या इंधन दर वाढीमुळे महागाई वाढली आहे तर, झाडे कापली जात असल्यामुळे सर्वत्र प्रदूषण पसरत आहे. हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सध्या विजेवर चालणाऱ्या बस आणि ट्रक सुरू करण्याबद्दल केंद्र सरकार विचार करत असल्याचे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. आत्तापर्यंत आपण केवळ रस्त्यांवरून धावणाऱ्या बस आणि ट्रक पाहात आलो आहोत. परंतु येत्या काही काळात रेल्वेप्रमाणे बस, ट्रकही विजेच्या तारांवर धावताना दिसणार आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “दिल्ली आणि मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा सरकारचा विचार आहे. मंत्रालयाने सर्व जिल्हे चौपदरी रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार २.५ लाख कोटी रुपयांचे बोगदेही बांधत आहे.”
येथे हायड्रोलिक ट्रेलर ओनर्स असोसिएशनच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, “सरकार दिल्ली आणि मुंबई दरम्यान इलेक्ट्रिक हायवेची योजना करत आहे. इलेक्ट्रिक हायवे हा सहसा असा रस्ता असतो ज्यावर चालणाऱ्या वाहनांना वीज पुरवठा केला जातो.”
वीजेवर चालणाऱ्या बस-ट्रकची योजनेची माहिती देताना- नितीन गडकरी
- वाहनांसाठी वीज रस्त्याच्या वर बसवलेल्या तारांद्वारे वाहनापर्यंत पोहोचवली जाते.
- गडकरी म्हणाले, “तुम्ही ट्रॉलीबसप्रमाणे ट्रॉली ट्रक चालवू शकता. ट्रॉलीबस ही एक इलेक्ट्रिक बस आहे जी ओव्हरहेड वायर्समधून वीज पुरवठ्यावर चालते.”
- मंत्रालयाने सर्व जिल्हे चौपदरी रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
- राज्यांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सर्व सेवा डिजिटल करण्याची गरज आहे.
पाहा व्हिडिओ: