मुक्तपीठ टीम
राज्यात आरे मेट्रो कारशेडचा मुद्दा ताजा असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाने पालघर जिल्ह्यात चांगलाच वेग घेतला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात ७१ गावांमधून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून जिल्ह्यातील २१८ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे.
पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग!!
- शिंदे आणि भाजपाचे सरकार येताच मोदी सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग आणखी वाढल्याचे दिसत आहे.
- या प्रकल्पासाठी भूसंपादन सध्या अंतिम टप्प्यात आला आहे.
- पालघर जिल्ह्यात ७१ गावांमधून बुलेट ट्रेन प्रकल्प जात असून जिल्ह्यातील २१८ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित केली जाणार आहे.
- सध्या ७० टक्क्यांपेक्षाही अधिक जमीन संपादित करण्यात आली असून शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला आहे.
- त्यामुळे २०२७ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचा दावा सरकार करून करण्यात आला आहे.
बाधित शेतकऱ्यांची योग्य मोबदला आणि योग्य पुनर्वसनाची मागणी!!!
- अजूनही काही प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, आता त्यांची इच्छा नसताना सरकार जोर जबरदस्ती करून या जमिनी घेऊ पाहत आहे.
- त्यामुळे नाईलाज असल्याचे मत बाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- आमच्यावर दबाव येत असल्याचा दावा विरोध करणारे शेतकरी करू लागले आहेत.
- आम्ही आमच्या जमिनी दिल्या तर योग्य मोबदला आणि योग्य पुनर्वसन केल जावं अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून सरकार समोर ठेवण्यात आली आहे.