Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय तरुणाच्या स्टार्टअपची कामगिरी, Android-13मधील ४९ चुका शोधल्या, गुगलकडून कोटींचं बक्षीस!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Technologist Aman Pandey

मुक्तपीठ टीम

मोबाईल फोन हा सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. लोकांचे स्मार्ट राहणे, बोलणे, वागणे यामागे कुठे ना कुठे स्मार्टफोनचा हात आहे. हा स्मार्टफोन जितका उपयोगी आहे तितकाच घातकही आहे. आता लवकरच लाँच होणार्‍या अॅंड्रॉईड-१३ मध्येही असाच एक घातक प्रकार समोर आला आहे.

एका इंदूरच्या मुलाचे भरभरून कौतुक होत आहे. गुगलही त्याच्या तल्लख बुद्धीमतेवर आश्चर्य करत आहे. इंदूरमधील तंत्रज्ञ अमन पांडे आणि त्यांच्या टीमला अॅंड्रॉईड १३मध्ये ४९ बग सापडले आहेत. अमन पांडे याची कंपनी बग्स मिरर अॅंड्रॉईड १३मध्ये सर्वाधिक त्रुटी शोधणारी जगातील शीर्ष बग संशोधक बनली आहे. यासाठी गुगलकडून कोटींचे बक्षीस मिळाले आहे. यामध्ये दोन बग युजर्ससाठी अतिशय धोकादायक होते.

अॅंड्रॉईड १३मध्ये घातक अश्या ४९ बगचा समावेश

  • गुगल काही दिवसांनंतर आपल्या यूजर्ससाठी अॅंड्रॉईड १३ लॉंच करणार आहे. हे अॅंड्रॉईडचे नवीन व्हर्जन आहे.
  • जेव्हा गुगल काहीतरी नवीन लॉंच करते, त्याआधी ते त्या उत्पादनाचे बीटा आणि अल्फा व्हर्जन संशोधकाला पाठवतात. तसेच त्यातील त्रुटी शोधण्यास सांगतात.
  • फेब्रुवारी २०२२ मध्ये, इंदूरचे तंत्रज्ञ अमन पांडे यांच्याकडे अॅंड्रॉईड १३चे बीटा व्हर्जन आले. यानंतर अमन आणि त्याच्या टीमने त्यातील त्रुटी शोधण्यास सुरुवात केली.
  • यावेळी, बग्स मिररच्या टीमला अॅंड्रॉईड १३च्या ४९ त्रुटी आढळल्या.

गुगलच्या अँड्रॉइड १३ उत्पादनामध्ये बग्स शोधण्याच्या बाबतीत बग्स मिरर हा टॉप बग शोधक आहे. त्याचवेळी गुगलने कंपनीच्या तांत्रिक टीमला कोटींचे बक्षीस दिले आहे. मात्र, एकूण किती रक्कम मिळाली हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

४९ बग्समधील २ बग्स यूजर्ससाठी अतिशय धोकादायक

  • अॅंड्रॉईड १३मध्ये बग शोधणारी बग्स मिरर ही जगातील पहिली टीम आहे.
  • अँड्रॉइड सुरक्षेबाबत, टीमला त्यात ४९ चुका आढळल्या आहेत.
  • यामध्ये, तुमच्या परवानगीशिवाय तुमचे लोकेशन घेऊन कोणीही तुमचा पाठलाग करू शकत होते.
  • कुठे जात आहात, काय खात आहात आणि काय करत आहात हे ते पाहू शकत होते.
  • त्याच वेळी, दुसरी मोठी समस्या अशी होती की कोणीतरी आपल्या फोनवर अॅप इनस्टॉल करून संपर्क माहिती मिळवू शकतो. यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते.
  • अँड्रॉइड १३ च्या या घातक बग्सबद्दल गुगलला माहिती नव्हती.

 


Tags: Android-13Bugs Mirror Companygood newsgoogleIndian YouthIndoremuktpeethstartupsTechnologist Aman Pandeyअॅंड्रॉईड १३इंदूरगुगलघडलं-बिघडलंचांगली बातमीतंत्रज्ञ अमन पांडेबग्स मिरर कंपनीभारतीय तरुणमुक्तपीठस्टार्टअप्स
Previous Post

राज्यात १९३१ नवे रुग्ण, १९५३ रुग्ण बरे! मुंबई ४८६, नाशिक ४५, नागपूर ८६ नवे रुग्ण !!

Next Post

दहा वर्षांच्या मेहनतीनंतर घेतली गाडी, तरूणाला आनंद महिंद्रांकडून मिळाल्या ‘या’ शुभेच्छा…

Next Post
Anand Mahindra

दहा वर्षांच्या मेहनतीनंतर घेतली गाडी, तरूणाला आनंद महिंद्रांकडून मिळाल्या 'या' शुभेच्छा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!