मुक्तपीठ टीम
मोबाईल फोन हा सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. लोकांचे स्मार्ट राहणे, बोलणे, वागणे यामागे कुठे ना कुठे स्मार्टफोनचा हात आहे. हा स्मार्टफोन जितका उपयोगी आहे तितकाच घातकही आहे. आता लवकरच लाँच होणार्या अॅंड्रॉईड-१३ मध्येही असाच एक घातक प्रकार समोर आला आहे.
एका इंदूरच्या मुलाचे भरभरून कौतुक होत आहे. गुगलही त्याच्या तल्लख बुद्धीमतेवर आश्चर्य करत आहे. इंदूरमधील तंत्रज्ञ अमन पांडे आणि त्यांच्या टीमला अॅंड्रॉईड १३मध्ये ४९ बग सापडले आहेत. अमन पांडे याची कंपनी बग्स मिरर अॅंड्रॉईड १३मध्ये सर्वाधिक त्रुटी शोधणारी जगातील शीर्ष बग संशोधक बनली आहे. यासाठी गुगलकडून कोटींचे बक्षीस मिळाले आहे. यामध्ये दोन बग युजर्ससाठी अतिशय धोकादायक होते.
अॅंड्रॉईड १३मध्ये घातक अश्या ४९ बगचा समावेश
- गुगल काही दिवसांनंतर आपल्या यूजर्ससाठी अॅंड्रॉईड १३ लॉंच करणार आहे. हे अॅंड्रॉईडचे नवीन व्हर्जन आहे.
- जेव्हा गुगल काहीतरी नवीन लॉंच करते, त्याआधी ते त्या उत्पादनाचे बीटा आणि अल्फा व्हर्जन संशोधकाला पाठवतात. तसेच त्यातील त्रुटी शोधण्यास सांगतात.
- फेब्रुवारी २०२२ मध्ये, इंदूरचे तंत्रज्ञ अमन पांडे यांच्याकडे अॅंड्रॉईड १३चे बीटा व्हर्जन आले. यानंतर अमन आणि त्याच्या टीमने त्यातील त्रुटी शोधण्यास सुरुवात केली.
- यावेळी, बग्स मिररच्या टीमला अॅंड्रॉईड १३च्या ४९ त्रुटी आढळल्या.
गुगलच्या अँड्रॉइड १३ उत्पादनामध्ये बग्स शोधण्याच्या बाबतीत बग्स मिरर हा टॉप बग शोधक आहे. त्याचवेळी गुगलने कंपनीच्या तांत्रिक टीमला कोटींचे बक्षीस दिले आहे. मात्र, एकूण किती रक्कम मिळाली हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
४९ बग्समधील २ बग्स यूजर्ससाठी अतिशय धोकादायक
- अॅंड्रॉईड १३मध्ये बग शोधणारी बग्स मिरर ही जगातील पहिली टीम आहे.
- अँड्रॉइड सुरक्षेबाबत, टीमला त्यात ४९ चुका आढळल्या आहेत.
- यामध्ये, तुमच्या परवानगीशिवाय तुमचे लोकेशन घेऊन कोणीही तुमचा पाठलाग करू शकत होते.
- कुठे जात आहात, काय खात आहात आणि काय करत आहात हे ते पाहू शकत होते.
- त्याच वेळी, दुसरी मोठी समस्या अशी होती की कोणीतरी आपल्या फोनवर अॅप इनस्टॉल करून संपर्क माहिती मिळवू शकतो. यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते.
- अँड्रॉइड १३ च्या या घातक बग्सबद्दल गुगलला माहिती नव्हती.