Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्टॅम्प पेपर घोटाळेबाज तेलगीच्या वेब सीरिजला स्थगिती नाही! Scam सिझन २मध्ये पत्रकार संजय सिंहांनी उघड केलेला घोटाळा!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Scam 2003

मुक्तपीठ टीम

मुंबई दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी दिग्दर्शक हंसल मेहतांच्या SCAM2003 या वेब सीरिजला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. तेलगीची मुलगी सना इरफानने कुटुंबाच्या गोपनीयता, सन्मान आणि स्वाभिमानाच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावा करत या वेब सीरिजविरोधात मुंबई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यात दोषी ठरलेल्या दिवंगत अब्दुल करीम तेलगी ज्येष्ठ पत्रकार, लेखक संजय सिंह यांच्या पुस्तकावर आधारित वेब सीरिजला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. संजय सिंह यांनी एनडीटीव्हीत असताना हा घोटाळा उघड केला होता.

तेलगीचा घोटाळा सोनीवर दिसणार!

  • अब्दुल करीम तेलगीची मुलगी सना इरफानने या वेब सीरिजविरोधात मुंबई दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • ही याचिका फेटाळून लावत न्यायालयाने वेब सीरिजच्या स्क्रीनिंगला स्थगितीस नकार दिला.
  • स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील मुख्य आरोपी तेलगीच्या घोटाळ्यावर आधारित वेब सीरिज २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
  • या वेब सिरीजचे पूर्ण नाव ‘Scam 2003: The Curious Case of अब्दुल करीम तेलगी’ असे आहे.

काय होता तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा?

  • २००४मध्ये तेलगीचा स्टॅम्प पेपर घोटाळा उघड झाला.
  • बाजारात असलेला स्टॅम्प पेपरची टंचाईचा फायदा घेत तेलगीने बनावट स्टॅम्प पेपरचा काळा धंदा सुरु केला.
  • आधी सरकारी अधिकारी कर्मचारी विकत घेत तो धंदा करत असे, नंतर तो स्वत:च ते छापू लागला.
  • राज्यांच्या महसुलाचा मोठा भाग तेलगी टोळी गिळू लागली.
  • तेलगीच्या महाघोटाळ्यात अधिकारी, कर्मचारीच नाही तर मोठे नेतेही सामील होते.

तेलगीचा तुरुंगातच मृत्यू…

  • कोट्यवधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये तेलगीला दोषी ठरवण्यात आले.
  • त्याला ३० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • तेलगीचा तुरुंगवास भोगत असताना ऑक्टोबर २०१७ मध्ये बंगळुरूमध्ये मृत्यू झाला.
  • तेलगीच्या मुलीने या वेबसिरीजच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
  • निर्मात्यांनी कुटुंबाची संमती घेतली नसल्याचा दावा मुलीने केला आहे.
  • त्यांच्या वकिलाने सांगितले की, अंतरिम दिलासा देण्याची त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
  • सनाने अधिवक्ता माधव थोरात यांच्यामार्फत दाखल केलेल्या खटल्यात आरोप केला की ही मालिका एका पुस्तकावर आधारित होती, यात तथ्यात्मक त्रुटी होत्या.
  • वेब सीरिजमुळे कुटुंबाच्या गोपनीयता, सन्मान आणि स्वाभिमानाच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Tags: Abdul telgimumbaiMumbai Civil CourtSana IrfanScam 2003अब्दुल करीम तेलगीमुंबईमुंबई दिवाणी न्यायालयस्टॅम्प पेपर घोटाळेबाज
Previous Post

कर्मचारी हक्काची जुनी पेन्शन लागू करा!

Next Post

अॅलर्जिक ऱ्हायनायटिस कशा प्रकारे टाळावे, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचार…

Next Post
Nasal Allergy

अॅलर्जिक ऱ्हायनायटिस कशा प्रकारे टाळावे, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!