मुक्तपीठ टीम
कोरोना काळात अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले. अनेक गरजूंच्या हाकेला धावून गेले. परंतु सध्या चर्चा आहे ती एका क्रिएटिव्ह उपक्रमाची. बॉलीवूडमधील अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, भूमी पेडणेकर, राजकुमार राव, सोनू सूद, अर्जुन कपूर आणि ताप्सी पन्नू हे सारे एकाच ठिकामी एकत्र. जरा जास्तच वाटेल. पण तसे घडले. ५ जून रोजी असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एका खास म्युझिक व्हिडीओमध्ये पाहायला मिळणार आहेत. हा व्हिडीओ संयुक्त राष्ट्र म्हणजेच यूनोशी संबंधित संस्थेने तयार केला आहे. हे सर्व सेलिब्रिटी या व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना आणि देशवासियांना पर्यावरणाविषयीचा महत्त्वपूर्ण संदेश देतील. पर्यावरण वनीकरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने हा व्हिडिओ तयार करण्यात येत आहे.
म्युझिकच व्हिडीओचे आकर्षण ठरणार
मुंबईतील पर्यावरणवादी कार्यकर्ते आसिफ भामला यांचा या व्हिडीओच्या निर्मितीत मोठा वाटा आहे. ते म्हणाले की, पर्यावरण रक्षण करणे ही या वर्षीची थीम आहे. आपल्या पूर्वजांनी ज्याप्रमाणे पर्यावरणाचे पुढच्या पिढीसाठी संवर्धन केले त्याचप्रमाणे आपण आपल्या पृथ्वीचे संवर्धन कसे करावे यावर हा म्युझिक व्हिडीओ लक्ष केंद्रित करेल. हे गाणे ५ जून रोजी रिलीज होईल.
स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या या गाण्याला शानने कम्पोज केले आहे. बी प्राक, अदनान सामी, शंकर महादेवन, पलक मुचल अशा सुप्रसिद्ध गायकांनी या गाण्याला आवाज दिला आहे. टॉप सेलेब्सव्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, मनीष मल्होत्रा, फा डिसूझादेखील या व्हिडीओमध्ये दिसतील.
पाहा व्हिडीओ: