Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना रोखण्यासाठी मुंबई मनपा सज्ज! नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई! वाचा काय करतेय मुंबई मनपा…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तपीठ टीम

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोक वर काढलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने चिंतेत भर पडली आहे. बुधवारी एकट्या मुंबईत २४४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळेच मुंबई मनपाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

 

वांद्र्यातील रोषणाई बंद करण्याचे महापौरांचे आदेश

मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत रणनीती ठरवली आहे. आता कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन होणं अत्यावश्यक असल्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आम्हालाही लॉकडाऊन नको आहे, पण मजबूर करु नका, असे मुंबईकरांना बजावले आहे. तसेच मोठी गर्दी जमू लागल्याने वांद्रे परिसरातील वंडरलँड रोषणाई बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही रोषणाई बंद कऱण्याचे त्यांचे पाऊल हे कठोर भूमिकेचे संकेत मानले जात आहे.

 

मनपा आयुक्त डॉ. चहल यांनी प्रशासनाची तातडीने बैठक घेवून याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी मनपा मुख्यालयात महापौर आणि आयुक्तांच्या उपस्थितीत आढावा बैठकही घेतले आहेत. दरम्यान, घेण्यात आलेल्या बैठकीनुसार कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडणाऱ्या हॉटेल आणि उपहारगृहांवर कठोर कारवाई केली आहे.

 

नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई…

  • मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आता नियम मोडणाऱ्यांना दणका देण्याच्या तयारी आहे.
  • हॉटेल व उपहारगृहांचे दैनंदिन सीसीटीव्ही फुटेज तपासणार
  • मनपा आणि पोलीस प्रतिनिधींचे संयुक्त भरारी पथक ठेवणार लक्ष
  • संयुक्त अरब अमिराती देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना आगमन प्रसंगी आरटीपीसीआर चाचणी व त्यासापेक्ष ७ दिवसांचे गृह विलगीकरण सक्तीचे
  • हवाईमार्गे आलेल्या व लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी बीकेसी आणि नेस्को कोरोना केंद्रात स्वतंत्र, निःशुल्क विलगीकरण व्यवस्था
  • मालाड आणि कांजूरमार्ग कोविड केंद्र तत्काळ कार्यान्वित करण्याचे निर्देश

 

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी कडक निर्देश

  • नववर्ष स्वागताचे कार्यक्रम / समारंभ / पार्टी आयोजित न करण्याच्या सूचना
  • हॉटेल्स्, उपहारगृहं यांच्यासह विविध आस्थापनांना उपस्थितीच्या मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत.
  • त्याचे योग्यरीतीने पालन होते आहे, यावर देखरेख ठेवण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांनी तातडीने भरारी पथकांची नेमणूक करावी.
  • स्थानिक पोलीस उपायुक्तांशी समन्वय साधून या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करावा.
  • नववर्ष स्वागत प्रतिबंधात्मक आदेश तसेच कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या हॉटेल्स्, उपहारगृहांवर कठोर कारवाई करावी.
  • सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या अखत्यारितील हॉटेल्स्, उपहारगृहं यांचे दैनंदिन फुटेज तपासून उपस्थितीचे नियम पाळले जात असल्याची खातरजमा करावी.

 

विभाग नियंत्रण कक्षापासून इतर सज्जेतेचा आढावा

  • सर्व विभाग कार्यालयांमधील विभाग नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) मध्ये येत्या दोन महिन्यांसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर अतिरिक्त संख्येने नेमण्यात येणार आहेत.
  • गृह विलगीकरणात राहत असलेल्या रुग्ण व व्यक्तींचा पाठपुरावा करण्यासह इतर वैद्यकीय सेवांसाठी या प्रशिक्षणार्थींच्या सेवा उपयोगात येतील.
  • सर्व रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रामधील मनुष्यबळ, संयंत्रे व इतर यंत्रणा, औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत किंवा कसे, याचा आढावा घेवून त्यामध्ये कमतरता राहणार नाही, याची खात्री करावी.

 

लहान मुलं आणि मोठ्यांसाठीही कोरोना केंद्रं कार्यान्वीत करण्याचे आदेश

  • मालाड येथील कोरोना उपचार केंद्र हे लहान मुलांवर उपचारांसाठी महत्त्वाचे आहे.
  • या केंद्रासह कांजूरमार्ग येथे उभारलेले कोविड उपचार केंद्र देखील लवकरात लवकर कार्यान्वित करावे.
  • हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांमधून, ज्या बाधितांना लक्षणे नाहीत (एसिम्प्टोमॅटिक) आणि औषधोपचाराची देखील गरज भासत नाही,
  • अशा रुग्णांसाठी वांद्रे-कुर्ला संकुल व गोरेगावातील नेस्को या दोन्ही कोरोना उपचार केंद्रामध्ये प्रत्येकी ५०० रूग्णशय्यांची स्वतंत्र विलगीकरण व्यवस्था कार्यान्वित करावी.
  • अशा एसिम्प्टोमॅटिक रुग्णांना तेथे निशुल्क विलगीकरणात राहता येईल.
  • जे रुग्ण सशुल्क विलगीकरण व्यवस्थेसाठी तयार असतील, त्यांना निर्देशित हॉटेल्स् मध्ये राहण्याची परवानगी देण्यात येईल.
  • या उपाययोजनेमुळे रुग्णालयांमधील रुग्णशय्या विनाकारण अडकून राहणार नाहीत व वैद्यकीय सेवेवरचा ताणदेखील कमी होईल.
  • प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीमध्ये, कोविड बाधितांच्या विलगीकरणासाठी किमान ५०० व्यक्ती क्षमतेचे कोविड काळजी केंद्र (सीसीसी २) लवकरात लवकर कार्यान्वित करावेत.

 

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी खास दक्षता

  • दुबईमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय हवाई प्रवाशांना सक्तीने सात दिवस गृह विलगीकरण करण्याचे निर्देश व त्याअनुषंगाने करायच्या कार्यवाहीबाबत महानगरपालिका प्रशासनाने दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी आदेश दिले आहेत.
  • या आदेशांमध्ये आता फक्त दुबईऐवजी संपूर्ण संयुक्त अरब अमिराती देशांचा समावेश करण्यात आला आहे.
  • तसेच संयुक्त अरब अमिराती (यूएई) देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विमानतळावर आगमनप्रसंगी आरटीपीसीआर (ऑन अरायव्हल टेस्टींग) चाचणी करावी लागेल.
  • या चाचणीच्या अहवालासापेक्ष व प्रचलित नियमानुसार संबंधित प्रवाशांचे विलगीकरण ठरविण्यात येईल.
  • विमानतळावर, रॅपिड टेस्टमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांची नियमित आरटीपीसीआर चाचणी करावी. ती चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रचलित नियमानुसार विलगीकरणाची कार्यवाही करावी.
  • जर चाचणी पॉजिटिव्ह आली तर त्या रुग्णास प्रचलित नियमानुसार विलगीकरण अथवा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा.
  • तसेच नियमित आरटीपीसीआर चाचणीचेच नमुने जनुकीय सूत्रनिर्धारण तपासणी (जिनोम सिक्वेसिंग) साठी पाठवावे.

Tags: aditya thackeraybrihanmumbai mahanagar palikacoronaguidelinesIqbal Singh Chahalmumbaiआदित्य ठाकरेइक्बालसिंह चहलकोरोनामनपामुंबई
Previous Post

अनिल देशमुखांविरोधात ईडीचं सात हजार पानांचं आरोपपत्र! ५० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप!

Next Post

मुंबई तिपटीनं वाढतंय ओमायक्रॉनचं संकट! महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा!

Next Post
mayor kishori pednekar

मुंबई तिपटीनं वाढतंय ओमायक्रॉनचं संकट! महापौर किशोरी पेडणेकरांचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!