Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल देशमुखांविरोधात ईडीचं सात हजार पानांचं आरोपपत्र! ५० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil deshmukh

मुक्तपीठ टीम

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं संकट संपताना संपत नाही, असं दिसत आहे. ईडीने मुंबईतील पीएमएलए न्यायालयात त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दाखल केलेल्या ७ हजार पानांच्या पुरवणी आरोपपत्रात देशमुख यांचे मुख्य संशयित आरोपी म्हणून निश्चित केले आहे. तसेच त्यांच्यासह मुलांवरही ५० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे.

 

ईडीच्या आरोपपत्रात कोणते मुद्दे?

ईडीने बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयात अनिल देशमुखांविरुद्ध सात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
या आरोपपत्रात अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांवर ५० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हे पैसे त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये बेकायदेशीरपणे गुंतवल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात अनिल देशमुख यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील यांच्यासह सीए भाविक पंजवानी यांचीही नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली आहेत.

 

अनिल देशमुख प्रकरणात सरकारी अधिकारी साक्षीदार

  • या आरोपपत्रात महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत.
  • संशयास्पद व्यवहारासंदर्भात ईडीला ऋषिकेश आणि सलील यांचे जबाब नोंदवायचे आहेत.
  • अंमलबजावणी संचालनालयाला त्यांच्या तपासादरम्यान देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये अनेक संशयास्पद व्यवहार केल्याचे आढळून आल्याचा उल्लेख केला आहे.
  • मात्र, चौकशीदरम्यान देशमुखांचे सीए भाविक पंजवानी आणि इतरांकडून ईडीला समाधानकारक उत्तरे मिळू शकलेली नाहीत.

 

देशमुख प्रकरणी दुसरे आरोपपत्र

  • अनिल देशमुख प्रकरणी बुधवारी ईडीने दाखल केलेले हे दुसरे आरोपपत्र आहे.
  • ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, ईडीने अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या संदर्भात पहिले आरोपपत्र दाखल केले होते.
  • सचिन वाझेला मुंबईतील डान्सबारकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश देऊन आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा देशमुख यांच्यावर आरोप आहे.

Tags: anil deshmukhEDMaharashtramumbaiparambir singhअनिल देशमुखईडीपरमबीर सिंगमुंबई
Previous Post

३१ डिसेंबर व नववर्ष स्वागत कार्यक्रमांसंदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचना

Next Post

कोरोना रोखण्यासाठी मुंबई मनपा सज्ज! नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई! वाचा काय करतेय मुंबई मनपा…

Next Post
bmc

कोरोना रोखण्यासाठी मुंबई मनपा सज्ज! नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई! वाचा काय करतेय मुंबई मनपा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!