Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडा यात्रा: राहुल गांधी तरुणीसोबत चालताच भाजपाकडून आक्षेपार्ह ट्वीट! वाचा नेटकऱ्यांचा संताप…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
priti gandhi troll

मुक्तपीठ टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा तेलंगणात पोहोचलीय. या यात्रेदरम्यान राहुल गांधी विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. या यात्रेत प्रसिद्ध अभिनेत्री पूनम कौर ही देखील सहभागी झालेली बघायला मिळाली. पूनम कौर राहुल गांधी यांच्या हातात हात घालून यात्रेत चालतानाच फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपाच्या प्रीती गांधी यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करत राहुल गांधी त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत असल्याची टीका केली. बघता बघता प्रीती गांधी यांची पोस्ट व्हायरल होत अनेक सोशल मीडिया यूजर्सनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. अभिनेत्री पूनम कौरनेही त्यांच्या ट्वीटला सडेतोड उत्तर दिले आहे.

काय आहे प्रीती गांधी यांचे ट्वीट

भाजपा नेत्या प्रीती गांधी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ट्विटरवर पोस्ट केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पूनम कौर या अभिनेत्रीचा हात धरलेला दिसत आहे. या फोटोवरून त्यांनी राहुल गांधी आपल्या आजोबांच्या पाऊलावर पाऊल टाकत असल्याचा उपरोधात्मक टोला लगावला आहे. प्रीती गांधी यांच्या या आक्षेपार्ह ट्वीटमुळे लोकांनी त्यांना टार्गेट केले आहे. पूनम कौरने देखील प्रीती यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Following the footsteps of his great grand father!!😂 pic.twitter.com/iAFMrOyg6w

— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) October 29, 2022

पूनम कौरने दिलं प्रत्युत्तर

  • पूनम कौरने ट्वीट करत, हे अपमानास्पद आहे, लक्षात असूदे की, पंतप्रधानांनी महिला शक्तीबद्दल सांगितले होते. मी जवळजवळ घसरली आणि पडणारच होते तेव्हा सरांनी माझा हात धरला, असल्याचे ती म्हणाली.
  • पुढे तिने लिहिले की, तेलंगणा काँग्रेसने शेअर केलेल्या त्याच फोटोवर राहुल गांधींचे कौतुक करताना पूनम म्हणाली की, महिलांबद्दलची त्यांची काळजी, आदर आणि संरक्षणात्मक स्वभाव माझ्या हृदयाला भिडला. विणकरांच्या समस्या ऐकल्याबद्दल मी राहुल गांधी यांच्यासह विणकरांच्या टीमचे मनापासून आभार मानते.

This is absolutely demeaning of you , remember prime minister spoke about #narishakti – I almost slipped and toppled that’s how sir held my hand . https://t.co/keIyMEeqr6

— पूनम कौर ❤️ poonam kaur (@poonamkaurlal) October 29, 2022

प्रीती गांधी झाल्या ट्रोल:

  • प्रीती गांधींचे हे ट्विट काही वेळातच व्हायरल झाले, ज्यामध्ये बहुतेक युजर्स त्यांना टार्गेट करत आहेत.
  • प्रीती गांधींच्या या पोस्टवर काँग्रेस नेते अभिषेक दत्त म्हणाले की, मला तुमच्या पती आणि मुलांबद्दल वाईट वाटते. तुमच्या गरीब मानसिकतेमुळे बिचाऱ्याला लाज वाटली असेल.
  • त्याचवेळी काँग्रेसच्या आमदार दीपिका पांडे म्हणाल्या की, “एक महिला असून इतके घानेरडे विचार. हे फक्त भाजपमध्येच शिकवले जाते. किमान ते आपल्या पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून भारताला एकसंध करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुमच्या पक्षाच्या अनेक खासदार आणि आमदारांवर बलात्कार आणि छळाचे गुन्हे दाखल आहेत. जर तुम्ही बोललात तर प्रत्येकाचे नाव लिहिते.”
  • महिलाविरोधी विचार ही संघांची परंपरा आहे, असे ट्विट उत्तर प्रदेश काँग्रेस सेवादलाने केले आहे.
  • @Nattashasharrma म्हणाले, “तुम्ही एक महिला असून इतक्या खालच्या पातळीला कसे काय जाऊ शकता…, मी आजपर्यंत तुम्हाला एवढं खाली घसरलेले पाहिलेलं नाही… तुम्हाला काही लाज आहे की विकली…?”
  • @anshuj55 म्हणाले- नक्कीच राहुल गांधी त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून संपूर्ण भारताला एकत्र करत आहेत. एका चांगल्या भविष्याचे स्वप्न दाखवत आहेत, जिथे सर्व नागरिक, लहान मुले, स्त्रिया आणि वृद्धांना स्वातंत्र्याचा श्वास घेता येईल. जिथे जातीयवादाचे विष नाही आणि प्रगतीची चर्चा आहे. म्हणूनच खरे भारतीय राहुल गांधी यांचा हात धरतात.
  • @preetikhatri22 म्हणाल्या की, अगदी बरोबरच, ते त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत या देशाला पुन्हा बंधुत्वाच्या आणि एकतेच्या धाग्यात बांधत आहेत.
    म्हणूनच तुम्हाला अतिसार होत आहेत.
  • @DeepakKumarGBN यांनी प्रत्युत्तर दिलं की, पूर्वजांनी भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला काय हरकत आहे, परंतु ज्यांच्या पूर्वजांचा काही ठाव-ठिकाणाच नाही त्यांना त्याचे काय महत्त्व कळेल?
  • @sanjivgiri_inc म्हणाले की, त्यांचे महान आजोबा हे स्वातंत्र्यसैनिक आहेत ज्यांनी ९ वर्षे तुरुंगात घालवली…. व्हाट्स अप विद्यापीठाच्या विद्यार्थी @MrsGandhi तुम्हाला स्वातंत्र्याचे सत्य कधीच कळत नाही….कारण तुम्ही माफिवर ग्रुपचे आहात…एवढ्या खालच्या पातळीला जाता तुम्ही?
  • @MdRizwan Hossai1
    प्रत्युत्तर देत म्हणाले की,
    जळणारे जळतच राहतील,
    राहुल गांधी तुम्ही पुढे जा
    आम्ही तुझ्या सोबत आहोत.
    राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस जिंदाबाद.
  • @priyanshuVoice
    प्रत्युत्तर देत म्हणाले की, @MrsGandhi
    होय! राहुल जवाहर होणार. आज देश त्यांच्या मेहनतीची कबुली देत ​​आहे. उद्या संपूर्ण जग त्यांच्या महानतेचे साक्षीदार होणार आहे. अहो
    राहुल गांधी, अभिमानाने तुमच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवा.❤️✨

अखेर कोण आहे पूनम कौर?

  • अभिनेत्री पूनमचा जन्म हैदराबादमध्ये झाला आहे आणि लहानाची मोठीही ती तिथेच झाली.
  • त्यानंतर त्यांनी हैदराबाद पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले.
  • तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT), दिल्ली येथून फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे.
  • २००६ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर ती चित्रपटांकडे वळली.
  • पूनम कौर मायाजलम या तेलगू चित्रपटात दिसली आहे.
  • याशिवाय निक्की आणि नीरज इ.मध्येही तिने काम केले आहे.
  • तिला २००८ मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.
  • २०१० मध्ये, उन्निपोल ओरुवनमध्ये काम केले. हा चित्रपट २००८ मध्ये आलेल्या ‘अ वेनडे’ या बॉलिवूड चित्रपटाचा रिमेक होता.
  • अलीकडेच पूनम कौरला मिस तेलंगणा स्पर्धेसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नामांकित करण्यात आले.

भारत जोडो यात्रा: भाजपाच्या आक्षेपार्ह ट्वीटचं लक्ष्य ठरलेल्या तरूणीनं सांगितलं राहुल गांधींनी का पकडला हात…


Tags: Bharat Jodo YatraCongressPoonam KaurPriti Gandhirahul gandhiTelanganaकाँग्रेसतेलंगणापूनम कौरप्रीती गांधीभारत जोडो यात्राराहुल गांधी
Previous Post

जेव्हा ‘ट्विटर’च्या नावे जागतिक माध्यमांचा ‘पोपट’ केला जातो…

Next Post

भारत जोडो यात्रा: भाजपाच्या आक्षेपार्ह ट्वीटचं लक्ष्य ठरलेल्या तरूणीनं सांगितलं राहुल गांधींनी का पकडला हात…

Next Post
poonam kaur

भारत जोडो यात्रा: भाजपाच्या आक्षेपार्ह ट्वीटचं लक्ष्य ठरलेल्या तरूणीनं सांगितलं राहुल गांधींनी का पकडला हात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!