Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दर ८ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू, जाणून घ्या कार्व्हिकल कॅन्सरचा धोका!

September 5, 2026
in आरोग्य
0
Cervical Cancer

मुक्तपीठ टीम

कार्व्हिकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग…हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर “ह्युमन पपिल्लोमा व्हायरस’ म्हणजेच एचपीव्ही या विषाणूद्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरुवातीला निदान होणे कठिण असते. आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. धक्कादायक बाब अशी की, या कर्करोगामुळे भारतात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. कार्व्हिकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आरोग्य संस्थांकडून जनजागृती शिबिरेही आयोजित केली जातात, ज्यामध्ये या कर्करोगाविषयी माहितीचा प्रसार, आरोग्य संस्थांवर समाजातील कार्व्हिकल कॅन्सरची माहिती, लक्षणे, ओळख, तपासणी, उपचार आणि प्रतिबंध याविषयी माहिती दिली जाते.

कार्व्हिकल कॅन्सर का होतो आणि तो टाळण्याचे उपाय काय आहेत आणि कोणत्या लक्षणांवरून तो ओळखता येतो हे जाणून घेणे सध्याच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या कॅन्सरचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.

कार्व्हिकल कॅन्सरमुळे भारतात दर ८ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू!

  • भारतात दर वर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील २२ हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो.
  • मिळालेल्या माहितीनुसार, कार्व्हिकल कॅन्सरगामुळे भारतात दर आठ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो.
  • कार्व्हिकल कॅन्सर पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे.
  • कार्व्हिकल कॅन्सर लवकर आणि नियमित तपासणीसह योग्य उपचाराने पूर्णपणे बरा होऊ शकतो.

कार्व्हिकल कॅन्सरची लक्षणे कशी ओळखावी?

  • योग्य वेळी लक्षणे ओळखून हा कॅन्सर सहज टाळता येऊ शकतो.
  • वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कार्व्हिकल कॅन्सर हा उच्च-जोखीम असलेल्या ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतो.
  • ज्या महिलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यांच्या शरीरातही हा विषाणू नष्ट होतो.
  • तसेच, या विषाणूच्या संपर्कात जास्त काळ राहिल्यास कार्व्हिकल कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
  •  सुरुवातीच्या टप्प्यातकार्व्हिकल कॅन्सरची लक्षणे आढळून येत नाहीत.
  •  त्याची प्रकरणे केवळ प्रगत अवस्थेत आढळतात.
  • ३० ते ६५ वयोगटातील महिलांनी आरोग्य संस्थांमध्ये नियमितपणे व्हीआयए चाचण्या घेतल्या तर हा कॅन्सर सहज ओळखता येतो.
  • या वयोगटातील महिलांनी त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रात पाच वर्षांतून एकदा व्हीआयए चाचणी घेणे आवश्यक आहे.

कार्व्हिकल कॅन्सरची लक्षणे कोणती ?

  • योनीतून असामान्य स्त्राव किंवा रक्तस्त्राव आणि ओटीपोटात वेदना होणे.
  • लैंगिक संबंधानंतर किंवा तपासणी केल्यावर रक्तस्त्राव होणे.
  • भूक कमी होणे, ओटीपोटात दुखणे, वजन कमी होणे.
  • कंबर, पाय दुखणे यांसारखी लक्षणेही जाणवू शकतात.

महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्भाशयाशी निगडीत आजार हे अस्वच्छतेमुळे होतात त्यामुळेत्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.


Tags: Cervical CancerhealthHuman Papilloma VirusmuktpeethWomen's Healthआरोग्यकार्व्हिकल कॅन्सरमहिला आरोग्यमुक्तपीठह्युमन पपिल्लोमा व्हायरस
Previous Post

आमदार खरेदी-विक्री: भाजपाच्या राष्ट्रीय महासचिवांना समन्स आलेलं प्रकरण आहे तरी काय?

Next Post

गृहमंत्री अमित शाहांनी मांडलं दहशतवादाचं टेक कनेक्शन…डार्कनेट, क्रिप्टोकरन्सी!

Next Post
amit shah

गृहमंत्री अमित शाहांनी मांडलं दहशतवादाचं टेक कनेक्शन...डार्कनेट, क्रिप्टोकरन्सी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!