Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता कृपाशंकर सिंहही मैदानात! संजय राऊतांना टोला, ‘दिन में बोले जय श्री राम, रात को लेते सौ-सौ ग्राम”

कृपाशंकरांना भाजपात वाढतं महत्व, राऊत काय उत्तर देणार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
kripashankar & raut

मुक्तपीठ टीम

शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये युती तुटल्यापासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत भाजपाविरोधात आक्रमक असतात. त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे सर्व नेते सरसावतात. त्यात मोहित कंबोज यांच्यासारखे काही वादग्रस्तही असतात. आता शिवसेनाविरोधात आक्रमकतेने पुढे सरसावणाऱ्या वादग्रस्त नावांमध्ये माजी काँग्रेस आणि आजी भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांची भर पडली आहे. त्यांनी संजय राऊतांना मारलेला टोला चर्चेचा विषय बनला आहे. ते म्हणाले, “संजय राऊतांचं असं आहे की ‘दिन में बोले जय श्री राम, और रात को लेते सौ सौ ग्राम.. जोगिरा सारारारा! त्यांना संजय राऊत काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

संजय राऊत माझे चांगले मित्र, पण…

  • संजय राऊत माझे चांगले मित्र आहेत.
  • आमची मैत्री आहे.
  • पण आज होळीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ते वारंवार म्हणत असतात शिवसेनेचे लोक अयोध्येला कारसेवेसाठी गेले, मंदिर बनवण्यासाठी गेले, आम्ही हिंदुत्वाचं पालन करू, आम्ही हिंदू आहोत वगैरे.
  • ते वारंवार हे बोलत आहेत.
  • पण त्यांना दोन पक्षांच्या सरकारसोबत वाटचाल करायीच आहे.

 

दिन में बोले जय श्री राम, रात को लेते सौ-सौ ग्राम!

  • असं म्हणतात वृंदावन मे आना है, तौ राधे राधे कहना है… पण संजय राऊतांचं असं आहे की ‘दिन में बोले जय श्री राम, और रात को लेते सौ सौ ग्राम.. जोगिरा सारारारा!.
  • राऊत आमचे चांगले मित्र असून त्यांची भेट घेऊन काही विषयांवर चर्चा करायची आहे.

 

कृपाशंकरांना भाजपात वाढतं महत्व, राऊत काय उत्तर देणार?

आता संजय राऊत आपल्या स्वयंघोषित मित्र असणाऱ्या कृपाशंकर सिंह यांना कसं उत्तर देतात, तेथे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना बेहिशेबी मालमत्ता आणि अन्य गुन्हे दाखल झाले होते. पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते मोकळे झाले. त्यांनी पुढे भाजपाचं कमळ हाती घेतलं. उत्तरप्रदेशात भाजपासाठी प्रचारही केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत ते त्यांच्यासोबत दिसल्याने भाजपा त्यांना मुंबई मनपाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतीय मतांसाठी महत्व देवू लागल्याचं दिसत आहे.


Tags: BJPkripashankar singhMaharashtrasanjay rautShivsenaकृपाशंकर सिंहभाजपाशिवसेनासंजय राऊत
Previous Post

कोल्हापूर पोटनिवडणूक: मविआविरोधात भाजपाकडून सत्यजीत कदम!शिवसेना लढणार नसल्यानं भाजपाXकाँग्रेस!

Next Post

एमआयएमची काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला ऑफर! खरंच भाजपाविरोधात नेम की बी टीमसारखा भाजपासाठीच गेम?

Next Post
imtiaz jaleel ambadas danve ajit pawar ashok chavan

एमआयएमची काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेला ऑफर! खरंच भाजपाविरोधात नेम की बी टीमसारखा भाजपासाठीच गेम?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!