Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्तरप्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरुणीवर सामूहिक बलात्कार, भाजपा नेता जेरबंद!

आधी फार्म हाऊसमध्ये, मग हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, त्यानंतर पीडितेला चालत्या गाडीतून फेकले

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Aagra

मुक्तपीठ टीम

विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेल्या उत्तरप्रदेशातील एका स्थानिक भाजपा नेत्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप झाला आहे. आपल्या साथीदारांसह आधी फार्म हाऊसमध्ये मग हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार, त्यानंतर पीडितेला चालत्या गाडीतून फेकल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंदवण्यात आला आहे.

 

भाजपाचा ब्लॉक प्रमुख लाल सिंग याने पीडित महिलेवर आग्रा हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर व्हिडिओ तयार केला. यानंतर या आरोपीने व्हिडिओ व्हायरल करणार असल्याची धमकी देत हॉटेलमध्ये नेऊन पु्न्हा बलात्कार केला.धक्कादायक बाब अशी की बलात्कारानंतर पीडितेला चालत्या कारमधून फेकण्यात आले, त्यामुळे तिला दुखापत झाली.

 

पीडित मुलीने दाखल केलेल्या गुन्ह्यात लिहिले आहे की, दोन महिन्यांपूर्वी तिला एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. त्याने आधी कॉल डिस्कनेक्ट केला. त्यानंतर तिला वारंवार फोन येऊ लागले. याबाबत ते बोलत होते. कॉलरने तिला सांगितले की, त्याला मैत्री करायची आहे. त्याचे नाव लाल सिंग होते. ते भाजपाचे ब्लॉक प्रमुख असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर तो आग्रा येथे येऊन भेटण्यास सांगू लागला. ती २१ डिसेंबर २०२१ ला भेटायला आली होती. आरोपी तिला कारमध्ये फार्म हाऊसवर घेऊन गेला. तिथे, त्याचे मित्र देव आणि जितेंद्र यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

 

फार्म हाऊसमध्ये व्हिडिओ बनवून दिली धमकी

  • पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, फार्म हाऊसमध्ये बलात्काराची तक्रार नोंदवायला सांगितल्यावर ब्लॉक प्रमुखाने तिला धमकावले.
    म्हणाले, आम्ही कोण आहोत हे तुम्हाला माहीत नाही.
  • आमच्यावर आमदाराचा हात आहे.
  • मोठमोठे पोलीस अधिकारीही त्यांचे पाय पडतात.
  • मी तुला काही मिनिटांत गायब करीन.
  • यामुळे ती तिच्या घरी गेली.
  • आरोपीने दुसऱ्या दिवशी पुन्हा अनेक फोन केले.
  • पुन्हा आग्रा येथे येण्यासाठी दबाव टाकला.
  • नकार दिल्याने त्याने फोनवर तिचा अश्लील व्हिडिओ पाठवला.
  • व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
  • एवढ्यात ती पुन्हा आली.
  • आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

 

कारमधून ढकलून आरोपी पळून गेला

  • रविवारी धमकावल्यानंतर पुन्हा एकदा आग्रा येथे बोलावण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला.
  • संध्याकाळी लाल सिंह आणि जितेंद्रने तिला ताजगंज भागातील हॉटेल अमर यात्री निवास येथे कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
  • प्रतिकार केल्याने तिला मारहाण करण्यात आली.
  • व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
  • अनेक मोठ्या लोकांच्या नावाने धाक दाखवला.
  • लाल रंगाच्या कारमधून आरोपींनी तिला हॉटेलबाहेर नेले.
  • फतेहाबाद रस्त्यावरील विशाल मेगा मार्टजवळ तिला चालत्या कारमधून ढकलून देण्यात आले.
  • यामुळे ती जखमीही झाली.त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली.

 

वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल

  • सीओ सदर राजीव कुमार यांनी सांगितले की, पोलिसांच्या तपासात अनेक पुरावे मिळाले आहेत.
  • कॉल डिटेल्समधून दोघांच्या संभाषणाची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
  • त्यामुळे आरोपी लाल सिंगचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
  • पीडित मुलीचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
  • तिचा अश्लिल व्हिडिओ बनवून धमकावल्याचे तरुणीने सांगितले आहे.
  • त्यावर आरोपीच्या मोबाईलमधून व्हिडिओ काढण्यात येणार आहे.
  • त्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची मदत घेतली जाणार आहे.
  • मुलीचे मेडिकल झाले आहे.
  • त्याचा अहवाल प्रलंबित आहे.
  • पोलिसांनी लाल सिंहला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.

Tags: BJPBJP LeadersGang RapedLal SinghUttarpradeshउत्तरप्रदेशभाजपालाल सिंगविधानसभा निवडणूकसामूहिक बलात्कार
Previous Post

कोरोनामुळे हरिद्वारमध्ये मकरसंक्रांतीला गंगा स्नानावर बंदी

Next Post

राज्यात २५ हजार महिला-मुली गायब! भाजपा नेत्या चित्रा वाघांचा खळबळजनक आरोप!

Next Post
Chitra Wagh's allegation against 25,000 women and girls missing from state

राज्यात २५ हजार महिला-मुली गायब! भाजपा नेत्या चित्रा वाघांचा खळबळजनक आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!