Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनामुळे हरिद्वारमध्ये मकरसंक्रांतीला गंगा स्नानावर बंदी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
haridwar

मुक्तपीठ टीम

उत्तराखंड राज्यातील हरिद्वार जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता मकर संक्रांतीच्या दिनी गंगा स्नानावर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विनय शंकर पांडे यांनी निर्देश दिले आहेत की, मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानासाठी हरकी पायडीसह सर्व गंगा घाटांवर कोणत्याही स्थानिक आणि बाहेरील व्यक्तीला जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही गंगेत स्नान करू दिले जाणार नाही.

 

कोरोनाची तिसरी लाट आणि जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिनी स्नानाला बंदी घातली आहे. उत्सव स्नानासाठी जिल्हा आणि इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही परिस्थितीत स्नान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एवढेच नाही तर हरकी पायडी परिसरात भाविक आणि स्थानिक लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

 

सण घरीच साजरा करण्याचे भाविकांना आवाहन

निरंजन पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांनी एका लेखी निवेदनाद्वारे भारतातील सनातनी भाविकांना कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घरातच राहून आणि मानसिकदृष्ट्या गंगेत स्नान करून मकर संक्रांतीचा सण साजरा करावा, असे आवाहन केले आहे.

 

हरिद्वारमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढतायत

  • हरिद्वार जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
  • दररोज मोठ्या प्रमाणात प्रकरणे समोर येत आहेत.
  • त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे.
  • १४ जानेवारीला मकर संक्रांती, मोठ्या संख्येने स्थानिक आणि इतर राज्यातील भाविक गंगा स्नानासाठी पोहोचतात.
  • कोरोनाची तिसरी लाट आणि बाधितांची वाढती संख्या पाहता जिल्हा दंडाधिकारी विनय शंकर पांडे यांनी सोमवारी सायंकाळी आदेश जारी करून मकर संक्रांतीच्या दिनी स्नानावर बंदी घातली आहे.

 

हरकी पायडी परिसरात प्रवेश प्रतिबंधित असेल

  • हरकी पायडी परिसरात भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या प्रवेशावर बंदी असेल.
  • इतर जिल्ह्यांतून आणि राज्यातून येणाऱ्या यात्रेकरूंना कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.
  • याचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय शंकर पांडे यांनी सांगितले.
  • जिल्ह्यात रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे सांगितले.

 

छायाचित्र: अपेक्षा सकपाळ


Tags: coronaHaridwarMakar SankrantUttarakhandउत्तराखंडकोरोनामकर संक्रांतीहरिद्वार जिल्हा प्रशासन
Previous Post

फडणवीस गेले, ठाकरे आले तरी महाराष्ट्रात स्वच्छ हवेकडे दुर्लक्षच! २०१९-२०२१ काम नाहीच!

Next Post

उत्तरप्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरुणीवर सामूहिक बलात्कार, भाजपा नेता जेरबंद!

Next Post
Aagra

उत्तरप्रदेशात ऐन निवडणुकीच्या तोंडावर तरुणीवर सामूहिक बलात्कार, भाजपा नेता जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!