मुक्तपीठ टीम
२०२० वर्षाला कोरोना संकटाने झाकोळलं तर नव्या २०२१ वर्षाच्या सुरुवातीलाच बर्ड फ्लूचं संकट उभे राहिलं आहे. परभणीत मेलेल्या ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाल्याचा अहवाल भोपाळच्या प्रयोगशाळेने दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उपाययोजना ठरवण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे, दापोली, परभणी व नागपूर येथील नमूने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातील फक्त परभणीचा तपासणी अहवाल आला आहे. इतर जिल्ह्यांमधील नमुन्यांचे तपासणी अहवाल आलेले नाहीत, असेही केदार यांनी सांगितले.
बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू आणि घबराट माजून विक्रीत घट असा पोल्ट्री व्यावसायिकांना दुहेरी फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी माध्यमांशी बोलताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत:
- अंडी किंवा कोंबडी यांना विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे.
- अंडी उकडून खाणार असाल किंवा ऑम्लेट, आमटी, बुर्जी असे अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल, अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवणे आवश्यक आहे.
- अर्धा तास ७० डिग्रीवर शिजवल्याने त्यातील जीवाणू मरून जातात.
- उच्च तापमानावर बनवलेले चिकन, अंडी यांचे पदार्थ तुमच्यासाठी सुरक्षित असतील.
हे ही वाचा: महाराष्ट्रात बर्ड फ्लू! परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल