मुक्तपीठ टीम
देशभरात एकीकडे कोरोनाचे संकट असतानाच दुसरीकडे ‘बर्ड फ्लू’ च्या संकटाचा धोका वाढतच आहे. या पाश्वभूमीवर गेल्या एका महिन्यात मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये जवळपास ५०पेक्षा जास्त कावळ्यांचा मृत्यू एका गूढ रोगामुळे झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घाटकोपर येथील मंगलवर्धनी या पशु कल्याण संस्थेचे अभय राणे आणि त्यांची टीम पक्षांसाठी काम करते. त्यांच्या संस्थेच्या सहा गाड्या दिवसभर फिरतात. गेल्या महिन्यापासून कावळे आजारी पडत असल्याची प्रकरणे समोर येऊ लागली. अशक्तपणामुळे त्यांना नीट उडताही येत नाही आहे. संस्थेसोबत असलेल्या डॉक्टरांच्या टीमने त्यांना मोकळ्या वातावरणात सोडलं मात्र काही कावळ्यांचा जीव वाचवण्यात त्यांना अपयश आलं.
हे ही वाचा: Bird Flu बर्ड फ्लू – अंडी, चिकन आवडतं? मंत्र्यांचा सल्ला वाचाच!
या संस्थेमध्ये मुलुंड आणि सायन दरम्यान असलेल्या पक्षी, मांजरी आणि कुत्र्यांवर उपचार केला जातो. घाटकोपर, चेंबुर, दादर या उपनगरांमध्ये हे कावळे सापडले. या आठवड्यात ठाण्यातील १० हून अधिक तलावांमधील बगळ्यांचा मृत्यू झाला होता.
हा व्हिडीओ पाहा: परभणीत कसा कळला बर्ड फ्लू?
राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, या पक्षांना बर्ड फ्लू झाला आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी नंदुरबारमधील नमुने भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच बंगाल, उत्तरप्रदेशमध्येही मृत कावळे आढळले आहेत.