प्रथिनांनी समृद्ध असलेल्या आहारात काबुली चण्यांचा देखील समावेश केला जातो. कारण तो एक अतिशय चांगला आणि चवदार पर्याय आहे. जो सहजपणे उपलब्ध होतो आणि बनविला जातो. जो विविध प्रकारे बनवून खाऊ शकतो. काबुली चण्यांव्यतिरिक्त टिक्की, सलाड असे बरेच पर्याय आहेत जे कोणत्याही प्रकारे हानिकारक नाहीत आणि शाकाहारासाठी हे खूप चांगले पर्याय आहेत.
प्रति १०० ग्रॅम काबुली चण्यांमध्ये जवळजवळ २६९ कॅलरीज, ४ ग्रॅम चरबी, ३४ ते ४५ ग्रॅम कर्बोहायड्रेट्स, ९ ते १२ ग्रॅम फायबर, ६ ते ७ ग्रॅम साखर, १० ते १५ ग्रॅम प्रथिने असतात.
१. रक्तदाब नियंत्रित करते
आहारात काबुली चण्यांचे सेवन केल्यास आपण वाढलेला रक्तदाब नियंत्रित करू शकतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, दररोज सुमारे ४,७०० मिलीग्राम पोटॅशियम आवश्यक आहे. तर एक वाटी काबुली चणे ४७४ मिलीग्राम पोटॅशियम देतात.
२. रक्तातील साखर नियंत्रित करते
मधुमेह हे बर्याच आजारांचे मूळ कारण आहे, म्हणूनच ते नियंत्रित ठेवण्यासाठी काबुली चण्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करा. एक कप काबुली चण्यांमध्ये १२.५ ग्रॅम फायबर असते, जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
३. पचनक्रियेत सुधारणा करते
काबुली चण्यांमध्ये सॉल्यूबल फायबर असतात जे पचनासाठी चांगले असतात. पचन प्रणाली निरोगी ठेवण्याशिवाय, यामुळे शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत होते.
४. मजबूत हाडांसह हिमोग्लोबीन वाढविण्यात देखील फायदेशीर आहे.
लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ए, ई, अँटीऑक्सिडेंट्स आणि इतर अनेक प्रकारचे पोषण हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. काबुली चण्यांचे पुरेसे प्रमाण घेतल्यास आपण अशक्तपणाची समस्यादेखील टाळू शकतो.