मुक्तपीठ टीम
झारखंड सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातून भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आमदार फोडण्यासाठी झारखंडला गेले होते, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. या आरोपांचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात इंकार केला आहे. मी काही राष्ट्रीय नेता नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी झारखंडला कधीच गेलो नव्हतो. झारखंडच काय रांचीलाही गेलो नसल्याचं, चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
आमदार फोडण्याचे आरोप हास्यास्पद!
- चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मी झारखंडला कधीही गेलो नाही.
- हे संपूर्ण प्रकरण हास्यास्पद आहे.
- मी झारखंडची रांचीही पाहिली नाही.
- झारखंडच्या १८१ आमदारांपैकी एकाही आमदाराचा नंबर माझ्याकडे नाही.
- मी काही राष्ट्रीय नेता नाही.
- मी महाराष्ट्रातील भाजपाचा एक छोटा कार्यकर्ता असून सचिव म्हणून काम करतो.
- हे सगळं कपोलकल्पित असल्याचं बावनकुळे म्हणाले.
काँगेस नेतेच म्हणतात, त्यांचे आमदार भाजपाच्या संपर्कात नाहीत!
- नाना पटोलेंनी माझ्यावर आमदार फोडाफोडीचा आरोप केला.
- पण काँग्रेसचा एकही आमदार भाजपाच्या संपर्कात नाही, हे आजच झारखंडच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
- तसेच कोणत्याही आमदाराने सरकार पाडण्याचा प्रयत्न केला नसल्याचंही काँग्रेसच्या अध्यक्षानेच म्हटलं आहे.
- अशा पद्धतीने जाणीवपूर्वक अफवा निर्माण करून मला आणि भाजपाला बदनाम केलं जात आहे.