Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखणाऱ्या खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करा”: रामदास आठवले

July 30, 2021
in घडलं-बिघडलं
0
ramdas athvle

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकार कडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आम्हाला कोणावरही पाळत ठेवण्याची गरज नाही. फोन टॅपिंगची गरज नाही. पेगॅसस बाबतचा केंद्र सरकारवरील आरोप बिनबुडाचा आहे. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहे. मात्र विरोधक चर्चा न करता संसदेत गोंधळ घालत आहेत. त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतर चौथ्या दिवशी ही जो संसद सदस्य आपली जागा सोडून मर्यादेबाहेर वर्तन करून गोंधळ घालून संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न करेल अशा गोंधळी खासदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याचा नियम सरकारने बनवावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

कोणत्याही विषयावर संसदेत चर्चा व्हावी एका मर्यादेपर्यंत विरोध प्रदर्शन व्हावे मात्र विरोधासाठी संसदेचे कामकाज रोखणे अत्यंत चूक आहे. सलग तीन दिवसा पर्यंत गोंधळ घालून संसदेतील कामकाज रोखणे चूक आहे.यामुळे संसदेचा बहुमोल वेळ वाया जातो. त्यातून देशाचे नुकसान होते.त्यामुळे सलग तीन दिवस गोंधळ घातल्यानंतरही जो खासदार चौथ्या दिवशी संसदेत गोंधळ घालेल त्यास २ वर्षांसाठी निलंबित करावे. सरकार पक्षाचा असो की विरोधी पक्षाचा खासदार असो सर्व खासदारांसाठी हा नियम बनवावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.

 

महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये एन डी आर एफ चा बेस कॅम्प उभरण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठीचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आपण प्रयत्न करू असे ना रामदास आठवले म्हणाले.

 

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खेळा नाही तर मोदींच्या समर्थनाचा मेळा होणार आहे असे रामदास आठवले म्हणाले. आगामी २०२४ मध्ये पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीए चे सरकार निवडून येईल असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात किती राजकीय पक्ष एकत्र येतील हा प्रश्नच आहे. विरोधी पक्षात एक नेता कुणी नाही. त्यामुळे मोदीं समोर कोणतेही मोठे आव्हान नाही असे रामदास आठवले म्हणाले.

 


Tags: MaharashtraMamata Banerjeeramdas athwaleकेंद्रीय गृहमंत्री अमित शहापंतप्रधान नरेंद्र मोदीममता बॅनर्जीमहाराष्ट्ररामदास आठवलेरायगड
Previous Post

“झारखंड आमदार फोडाफोडीचे आरोप म्हणजे बदनामीचा प्रयत्न!”

Next Post

सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात

Next Post
devendra fadanvis

सांगलीचा दौरा आटोपून देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!