मुक्तपीठ टीम
बजाजची पल्सर ही भारतातील सर्वाधिक पसंतीची बाइक आहे. ही बाईक त्याच्या परफॉरमन्स, डिझाइन आणि रिलायबिलिटीमुळे तरुणाईमध्ये हीट आहे. अलीकडेच बजाजने भारतात आपली पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन लॉंच केली आहे. जर बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बाईक उत्तम पर्याय ठरू शकते.
बजाज पल्सर १२५ कार्बन फायबरचे आकर्षक फिचर्स
- बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन या बाईकमध्ये फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ५ स्टेप अॅडजस्टेबल रिअर नायट्रोक्स सस्पेंशन देण्यात आले आहे.
- उत्तम सुरक्षेसाठी कंपनीने या बाईकच्या पुढील बाजूस २४०एमएम व्हेंटिलेटेड डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक वापरला आहे. . या बाइकमध्ये ड्युअल डिस्क ब्रेकचा पर्याय नाही आहे.
- यात व्हीलबेस १ हजार ३२० एमएम आहे आणि त्यात १७-इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत.
बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन इंजिन फिचर्स
- बजाजच्या या बाईकचे इंजिन १२४.४ सीसी आहे.
- हे इंजिन त्याच्या सेगमेंटमध्ये खूप पॉवरफुल आहे.
- जर या इंजिनच्या पॉवर आउटपुटबद्दल बोललो तर, हे नवीन इंजिन ८ हजार ५०० आरपीएमवर ११.६४ बीएचपी पॉवर आणि ६ हजार ५०० आरपीएमवर १०.८० एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- कंपनीने हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्ससोबत पेअर केले आहे.
बजाज पल्सर १२५ कार्बन फायबरची किंमत
- बजाज बाईकमध्ये २ ऑप्शन मिळणार आहेत.
- या बाइकमध्ये रेड आणि ब्लू कलर ऑप्शन आहेत.
- पहिला ऑप्शन सिंगल सीटसह येतो, ज्याची किंमत ८९ हजार २५४ रुपये एक्स-शोरूम दिल्ली आहे.
- दुसरा ऑप्शन स्प्लिट सीटसह येतो आणि कंपनीने त्याची किंमत ९१ हजार ६४२ एक्स-शोरूम दिल्ली आहे.