Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातील आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेत महाराष्ट्रातील चार खेळाडू

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
International Senior Kurash Competition

मुक्तपीठ टीम

कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने २३ ते २८ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होऊ घातलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. एकूण ६५ देशांतून ५०० पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहेत. भारतीय संघात महाराष्ट्रातून चार खेळाडूंचा समावेश झाला असून, आदित्य धोपगावकर (अहमदनगर), गौतमी कांचन (पुणे), स्नेहल खावरे (पुणे), गणेश लांडगे (अहमदनगर) हे महाराष्ट्रातील चौघे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा इंटरनॅशनल कुराश असोसिएशन व ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यतेने होत असून, भारत देशात कुराश इंटरनॅशनल चॅम्पियनशिप आयोजन करण्याची ही चौथी वेळ आहे.

कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे चीफ पॅट्रोन जगदीश टायटलर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी कुराश असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश पोपली, सचिव लालसिंग, खजिनदार धर्मेंद्र मल्होत्रा, कुराश असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र पॅट्रोन आणि स्पर्धेच्या प्रमुख संयोजिका ॲड. स्मिताताई निकम, कुराश महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नगरे, संतोष चोरमुले, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे शिवाजी साळुंखे, वन की इव्हेंट्स अँड ओके सर सिक्युरिटी अँड बाउंसर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲड. स्मिताताई निकम म्हणाल्या, “कुराश हा हजारो वर्षांपासून प्रचलित असलेला दोन स्पर्धकांतील युद्धकलेचा प्रकार आहे. स्त्री व पुरुष अशा दोन्ही गटात, विविध वजनी गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार, दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी विविध देशाचे क्रीडामंत्री, तसेच उच्चाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोपाला माजी खासदार उदयनराजे भोसले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, भारतीय क्रीडा प्रशासक राजा रणधीर सिंग आदी उपस्थित राहणार आहेत.”


Tags: good newsInternational Senior Kurash CompetitionMaharashtramuktpeethpuneआंतरराष्ट्रीय वरिष्ठ कुराश स्पर्धाचांगली बातमीपुणेमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

सर्जिकल रोबोट बनवणाऱ्या एसएस इनोव्हेशनची ग्लोबल भरारी, अमेरिकन कंपनीसोबत करार!

Next Post

बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन भारतात लाँच!

Next Post
Bajaj Pulsar 125 Carbon Fiber Edition

बजाज पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन भारतात लाँच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!