Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी मुंबईत बहरतंय मियावाकी वनीकरण, आतापर्यंत ५७ हजार वृक्षारोपण

February 8, 2021
in चांगल्या बातम्या
0
adity

मुक्तपीठ टीम

 

जगभर वाखाणणी होत असलेल्या जपानमधील मियावाकी शहरी वनीकरणाची पद्धत आता मुंबईतही बहरतेय. पर्यावरणमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी या वनीकरणाला प्रोत्साहन दिलंय. त्यांनी नुकतीच मुंबईतल्या चेंबूर येथील भक्ती पार्क येथील मियावाकी पद्धतीने लागवड केलेल्या वनीकरणाची पाहणी केली.

 

गेल्या वर्षी २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत आदित्य ठाकरे यांनी भक्ती पार्कमध्ये मुंबई महापालिकेचा पायलट प्रोजेक्ट असलेल्या मियावाकी पद्धतीने वृक्षारोपणास सुरुवात केली होती. त्यावेळी २१ हजार वृक्षांची लागवड केली होती. आता तेथे ५७ हजार वृक्षांची लागवड झाली आहे. येत्या दोन महिन्यात आणखीन १२ हजार वृक्षांची लागवड तेथे केली जाणार असून या वर्षाच्या अखेरपर्यंत मुंबईत मियावाकी पद्धतीने कमीतकमी तीन लाख झाडे लावण्याचा मुंबई महापालिकेचा मानस आहे.

 

यासंदर्भात पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, जंगलांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे, पण अशा पद्धतीने शहरांमध्ये जंगल निर्माण करून पर्यावरण संवर्धन हा आमचा प्रयत्न आहे. येत्या काळात राज्यात इतर शहरांमध्येदेखील मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करून शहरी जंगल निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहूल नाला येथील कांदळवन परिसराचीही पहाणी केली. मँग्रोव्ह सेलच्या उपवनसंरक्षक सोमराज निनू यांच्यासोबत चर्चेनंतर कांदळवनांवर होणाऱ्या डंपींगबाबत तत्काळ कठोर कारवाईचे आदेश ठाकरे यांनी दिले. आमदार प्रकाश फातर्पेकर, नगरसेवक श्रीकांत शेट्टी यावेळी उपस्थित होते.

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली मुंबईतील विविध विकासकामांची पाहणी

 

या पाहणी दौऱ्याच्या सुरुवातीस पालकमंत्री ठाकरे यांनी मानखुर्द फ्लायओव्हरच्या कामाची पाहणी केली व तेथील कामाचा आढावा घेतला. हा ब्रीज एकूण २.९ किमी लांबीचा आहे. त्यातील २.५ किमी लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. उर्वरित ४०० मीटरचे काम देखील पूर्ण होत आले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल जनतेसाठी खुला होणार आहे. घाटकोपर-मानखुर्द दरम्यान देवनार डंपिंग जंक्शन असल्याने तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरून मुंबईबाहेर जाण्यासाठी किंवा नवी मुंबईकडे जाण्यासाठी हा महत्वपूर्ण रस्ता असल्याने येथे रहदारी असते. या परिस्थितीतही मुंबई महानगरपालिकेने उड्डाणपुलाचे काम वेगात करून पुर्णत्वापर्यंत आणले आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. या पाहणीवेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू, मुख्य अभियंते राजन तळकर, उपायुक्त अनंत कदम तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: aditya thackerayCM Udhav thackerayCMO MaharashtraEnvironment Minister Aditya Thackerayपर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

#चांगलीबातमी आता रेल्वे प्रवासही झाला ‘कॅशलेस’, टीसींकडेही चालणार कार्ड पेमेंट

Next Post

#नोकरीधंदाशिक्षण अहमदनगरच्या कॅन्टोनमेंट बोर्डात रोजगार संधी, विविध पदांवर भरती

Next Post
ahamadnagar

#नोकरीधंदाशिक्षण अहमदनगरच्या कॅन्टोनमेंट बोर्डात रोजगार संधी, विविध पदांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!