Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निवडणुकांवर लक्ष…अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माणाचा वेग वाढवण्याचे लक्ष्य!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ram

मुक्तपीठ टीम

देशातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भाजपाने आगामी उत्तर प्रदेश आणि २०२४ची लोकसभा अशा दोन निवडणुका लक्षात घेऊन काम सुरु केले आहे. त्यासाठीच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्यास गती देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मानले जाणारे आणि राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष असलेले नृपेंद्र मिश्रा अयोध्येत पोहचले असून ते खास प्रयत्न करणार आहेत.

 

 

उत्तर प्रदेशात कोरोना महासंकटात भाजपासाठी राजकीय महासंकट तयार झाल्याचे मानले जाते. त्यामुळे त्या राज्यासाठी सर्वात महत्वाचा असलेल्या राम मंदिराच्या भावनात्मक मुद्द्यावर भाजपाने केवळ भूमिपूजनच केले नाही तर निर्माण कार्यालाही गती दिली हे दाखवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. त्यासाठीच किमान लोकांना दाखवता यावं एवढं तरी काम २०२२ला उत्तर प्रदेशातील हिंदू मतदारांसमोर मांडता यावं असा प्रयत्न असेल.

 

 

कोरोना महासंकटाचा फटका भाजपाला केंद्रीय पातळीवरही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वार सात वर्षात प्रथमच कडवट टीकेला सामोरे जावे लागले. प्रादेशिक नेतृत्व त्यांच्यापेक्षा लोकप्रियतेत पुढे असल्याचे प्रथमच दिसून आले. त्यातूनच मग मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर २०२४मध्ये मतदारांना सामोरे जाताना आम्ही करून दाखवलं असा दावा करण्यासाठी एखादा मुद्दा साथीला असावा, असा प्रयत्न आहे. त्यासाठीच २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करून मंदिर प्रवेशाचा अतिभव्य सोहळा साजरा करण्याचा अजेंडा ठरवण्यात आला असावा.

 

 

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू नोकरशहा आणि राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष असलेले नृपेंद्र मिश्रा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते आज अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दोन दिवस चालणार्‍या या बैठकीत मंदिराच्या बांधकामाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात येणार आहेत.

 

 

अयोध्येतील श्री राम मंदिर निर्मितीला वेग देणार

• नृपेंद्र मिश्रा हे रामजन्मभूमी संकुलातील पायाभूत बांधकाम स्थळाची पाहणी देखील करतील.
• २०२४ पूर्वी राम मंदिर पूर्ण होईल, असा समितीचा दावा आहे.
• पुढील लोकसभा निवडणुकीतही राम मंदिराचा मुद्दा असणार हे स्पष्ट आहे.
• एल अँड टी, टाटा कन्सल्टन्सी या बांधकाम कंपनीचे अधिकारीही ट्रस्टच्या सदस्यांसह या बैठकीला उपस्थित राहतील.
• बैठकीत मंदिराच्या भिंतीवर कोणते दगड वापरले जातील यावरही निर्णय घेण्यात येईल.
• ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्यासह अन्य विश्वस्त आणि वास्तुविशारद आशिष सोमपुरा हेही या बैठकीस उपस्थित राहतील.
• राम जन्मभूमी संकुल आणि पूर्वी स्थापित झालेल्या कार्यशाळेचीही पाहणी केली जाईल.


Tags: ayodhyamuktpeethNarendra modiRam Mandir
Previous Post

नक्षलवाद्यांनाच संभाजी छत्रपतींचे प्रतिआवाहन…शिवबांचे पाईक असाल तर मुख्य प्रवाहात या!

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना २६ जूनच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाची खूशखबर मिळणार?

Next Post
7th pay commission

केंद्रीय कर्मचाऱ्यांना २६ जूनच्या बैठकीत सातव्या वेतन आयोगाची खूशखबर मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!