Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखारा ठरली कांस्यपदकाचीही मानकरी! प्रवीण कुमारचीही रौप्य उंच उडी!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
tokyo

मुक्तपीठ टीम

या वर्षाचं पॅरालिम्पिक भारतासाठी नवे विक्रम घडवणारे ठरते आहे. आजवर जिंकली नाही तेवढी पदके मिळवण्यात भारतीय खेळाडू यशस्वी ठरत आहेत. जपानच्या टोकियोमध्ये खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. एअर रायफलमध्ये अवनी लेखारानं सुवर्ण पदक मिळवून भारताचे नाव सन्मानाने उंचावलं, तिनेच आता देशासाठी कांस्यपदकही मिळवले आहे. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती देशातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर प्रवीण कुमारने हायजम्पमध्ये आजच रौप्य पदक मिळवले आहे.

 

विक्रमी अवनी!

  • कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी नेमबाज अवनी लेखारा हिने विक्रम प्रस्थापित करून सुवर्ण जिंकले होते.
  • सुवर्ण जिंकणारी ती भारतीय इतिहासातील पहिली महिला पॅरालिम्पिक खेळाडू ठरली.
  • आता अवनीने महिलांच्या ५० मीटर रायफल 3पी एसएच1 मध्ये ४४५.९ गुणांसह कांस्यपदक जिंकले आहे.
  • या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवनीचे अभिनंदन केले आहे.

 

प्रवीण कुमारची रौप्य पदक मिळवणारी उंच उडी!

  • भारतीय खेळाडू प्रवीण कुमारने पुरुषांच्या हाय जम्पमध्ये रौप्य पदक पटकावले. यासह भारताची एकूण पदकांची संख्या १२ झाली आहे.
  • प्रवीण कुमारने २.०७ मीटर उडी घेऊन आशियाई विक्रम मोडला.
  • ग्रेट ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रथम स्थान पटकावले.
  • निषाद कुमार, मरिअप्पन थंगावेल्लू आणि शरद कुमार यांच्यानंतर टोकियो गेम्समध्ये पुरुषांच्या हाय जम्पमध्ये प्रवीण कुमार भारताचा चौथा पदक विजेता आहे.

 

या यशानंतर प्रवीणकुमार म्हणाला, “मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले. मी माझे प्रशिक्षक डॉ सत्यपाल सिंह यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि प्रेरणा दिली. मी एसएआय, पीसीआय आणि माझ्या कुटुंबाचे आभार मानू इच्छितो.”

  • भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
  • यापूर्वी भारताने २०१६ च्या रिओ गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकली होती. नेमबाज अवनी लेखरा आणि भाला फेकणारा सुमित अंतिल यांनी सुवर्ण जिंकले आहे तर, प्रवीण भारताचे सहावे रौप्यपदक विजेते आहेत.
  • याआधी पॅडलर भाविना पटेल, भाला फेकणारा देवेंद्र झाझरिया, डिस्कस थ्रोअर योगेश कठुनिया आणि हाय जम्प मारणारे थंगावेल्लू आणि निषाद यांनी हा पराक्रम दाखवला आहे.

Tags: pravin kumarprime minister narendra modiअवनी लेखाराटोकियो पॅरालिम्पिकदेवेंद्र झाझरियापंतप्रधान नरेंद्र मोदीभावना पटेलरौप्य पदक
Previous Post

“नवी मुंबईत प्रवर्तक विकासकांचा अतिरिक्त अधिमूल्यावरील जीएसटीचा भुर्दंड वाचणार!”

Next Post

देशात कोरोना स्थिती वाईटच, घरात राहूनच सण साजरे करा- केंद्राने बजावलं

Next Post
ICMR-BJP

देशात कोरोना स्थिती वाईटच, घरात राहूनच सण साजरे करा- केंद्राने बजावलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!