Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात कोरोना स्थिती वाईटच, घरात राहूनच सण साजरे करा- केंद्राने बजावलं

September 3, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ICMR-BJP

मुक्तपीठ टीम

कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. त्यात तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सण घरात राहूनच साजरे करा, असं केंद्र सरकारने बजावलं आहे. तसंच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचं आवाहनही केंद्राने केलं आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या बाबतीत काळजी घेण्याचं आवाहन करत असताना राज्यातल्या भाजपाची मात्र वेगळीच भूमिका दिसून येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राज्य भाजपा विरुद्ध राज्य सरकार असा स्थानिक संघर्ष भडकतच जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारचा इशारा

  • देशातली कोरोनाची स्थिती अजूनही वाईटच आहे. त्यामुळे घरात राहूनच सणवार साजरे करा.
  • कोरोना नियमांचं पालन करा.
  • लसीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्या.
  • डेल्‍टा प्‍लसचे जवळपास ३०० रुग्ण आढळलेले आहेत.

देशातली कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे?

  • २४ तासात ४७ हजार ९२ नवे रुग्ण आढळलेत.
  • एकूण ३ लाख ८९ हजार ५८३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
  • केरळमधली स्थिती चिंताजनक आहे. एकट्या केरळमध्ये कोरोनाचे ३२ हजार ९२ रुग्ण आहेत.
  • केरळमध्ये आतापर्यंत ४१ लाखहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
  • २४ तासात ६५ लाख ६५ हजार नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
  • आतापर्यंत एकूण ६६ कोटी ८९ लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
  • देशातल्या ५४ टक्के नागरिकांचा लसीकरणाचा पहिला डोस झाला आहे.
  • देशातल्या १६ नागरिकांचे कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस झाले आहेत.

 

राज्य भाजपा – राज्य सरकार संघर्षाचे मुद्दे

दहीहंडी सार्वजनिकरीत्या साजरी करण्यावरून भाजपा, मनसे विरुद्ध आघाडी सरकार असा वाद चांगलाच रंगला.

 

बैलगाडा शर्यती

ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती लोकप्रिय असतात. पण कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे आयोजित करण्यावर बंदी आहे. तसे असतानाही भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे समर्थन केले.

 

बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही पूर्णपणे सोबत आहोत.
यासाठी पुढील काळात सर्व ते प्रयत्न करू!
यासंदर्भात शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद…https://t.co/WJrYgK9K5W pic.twitter.com/aKJ2BPEIym

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021

मंदिर प्रवेश

भाजपाने मंदिर प्रवेशासाठी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. मनसेही राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर या मुद्द्यावर आक्रमक आहे.

मंदिर प्रवेशावरून आक्रमक झालेल्या भाजपाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या आदेशाकडे भाजपाचे लक्ष वेधले. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर देताना अन्य राज्यातील मंदिरं उघडल्याचे दाखले दिले. तसेच मंदिरं खुली करण्यावरून आपले अपयश लपविण्यासाठी केंद्र सरकारवर दोषारोपण बंद करा, असा टोला लगावला.

 

बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही पूर्णपणे सोबत आहोत.
यासाठी पुढील काळात सर्व ते प्रयत्न करू!
यासंदर्भात शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांच्याशी साधलेला संवाद…https://t.co/WJrYgK9K5W pic.twitter.com/aKJ2BPEIym

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 1, 2021


Tags: BJPcentral govtcoronadevendra fadanvisकोरोनादेवेंद्र फडणवीस
Previous Post

सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखारा ठरली कांस्यपदकाचीही मानकरी! प्रवीण कुमारचीही रौप्य उंच उडी!

Next Post

ठाण्याच्या कल्पिता पिंपळेंशी मुख्यमंत्री बोलले, “तुम्ही लवकर बरे व्हा, कारवाईची जबाबदारी आमची”

Next Post
Maha Cm

ठाण्याच्या कल्पिता पिंपळेंशी मुख्यमंत्री बोलले, "तुम्ही लवकर बरे व्हा, कारवाईची जबाबदारी आमची"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!