Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नवी मुंबईत प्रवर्तक विकासकांचा अतिरिक्त अधिमूल्यावरील जीएसटीचा भुर्दंड वाचणार!”

रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा लाभ देण्याचा सिडकोचा निर्णय

September 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
CIDCO

मुक्तपीठ टीम

भूखंडाकरिता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर करून घेण्याकरिता भराव्या लागणाऱ्या अतिरिक्त अधिमूल्यावर प्रवर्तकांना (प्रमोटर्स) रिव्हर्स चार्ज मेकॅनिझनमचा लाभ घेता येईल असा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

सिडको व्यवस्थापकीय संचालकांनी स्पष्ट केली भूमिका

  • सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममागील भूमिका मांडली आहे.
  • कोरोनामुळे प्रतिकूलतेला सामोरे जावे लागलेल्या बांधकाम क्षेत्रास चालना देण्याकरिता सिडको सातत्याने प्रयत्नशील आहे.
  • प्रवर्तक विकासकांना अतिरिक्त अधिमूल्यावर जीएसटी भरावा लागू नये हा प्रयत्न आहे.
  • जीएसटी अधिनियमाच्या अंतर्गत त्यांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा पर्याय निवडल्यास त्यांना या पर्यायाच्या अंतर्गत लाभ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
  • यामुळे विकासकांवरील आर्थिक भार बऱ्याच अंशी कमी होणार आहे.

 

महाराष्ट्र शासनाचे एकात्मिक विकास आणि प्रोत्साहन नियमावली २०२० (युडीपीसीआर २०२०) धोरण संपूर्ण नवी मुंबईसह सिडको अधिकारक्षेत्राला लागू होत असल्याने या धोरणांतर्गत भाडेपट्टाधारकाकडून अतिरिक्त अधिमूल्य आकारून, भूखंडाकरिता अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याची तरतूद आहे. यानुसार सिडकोकडून नवी मुंबईमध्ये वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांकरिता अनुज्ञेय अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्याकरिता जीएसटीसह अतिरिक्त अधिमूल्य आकारण्यात येते. परंतु काही प्रवर्तक अर्जदारांनी अतिरिक्त अधिमूल्यावर जीएसटी आकारण्यात येऊ नये, याबाबतची विनंती सिडकोला केली होती.

 

या संदर्भात सिडकोकडून जीएसटी तज्ज्ञ सल्लागारांबरोबर विचारविनिमय करण्यात आला. सदर तज्ज्ञांनी केलेल्या सूचनेनुसार, संबंधित भूखंडावर निवासी बांधकाम प्रकल्प किंवा कोणताही बांधकाम प्रकल्प विकसित करून त्याची खरेदीदारांना विक्री करू इच्छिणाऱ्या प्रवर्तकाकडून अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकावर आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त अधिमूल्यावर सिडकोला जीएसटी आकारण्याची व संकलित केलेला जीएसटी कर यंत्रणांना अदा करण्याची आवश्यकता नाही. या ऐवजी अधिसूचना क्र. ०४/२०१९ आणि ५/२०१९ सीजीएसटी रेट नुसार, संबंधित प्रवर्तक हे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत कर भरू शकतात, अशी सूचना तज्ज्ञ सल्लागारांकडून करण्यात आली.

 

रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रवर्तक अर्जदारांनी काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. अर्जदारांकडून आपण उपरोक्त जीएसटी कायद्यातील तरतुदींनुसार रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमचा लाभ घेण्यास पात्र असल्याची पुष्टी देणारी विनंती करण्यात यावी. अर्जदारांकडून रेरा अधिनियम २०१६ नुसार आपण प्रवर्तक असल्याची पुष्टी करण्यात यावी. अर्जदारांनी ५०० रुपयांच्या न्यायिकेतर स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तथा वचनपत्र सादर करून, अधिसूचना क्र. ०४/२०१९ आणि ०५/२०१९ सीजीएसटी रेट नुसार रिव्हर्स चार्ज मेकॅनिझन अंतर्गत आपण आपले जीएसटी दायित्व निभावणार असल्याबाबत पुष्टी द्यावी.

 

तरी लवकरात लवकर उपरोक्त आवश्यक बाबींची पूर्तता करून अधिकाधिक प्रवर्तकांनी रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंतर्गत देण्यात येणाऱ्या जीएसटी सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

 


Tags: CIDCOmumbaiडॉ. संजय मुखर्जीमुंबईयुडीपीसीआर २०२०रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमसिडको
Previous Post

घरच्या गॅस सिलिंडरची सबसिडी खात्यात आली नाही? समजून घ्या कारण…

Next Post

सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखारा ठरली कांस्यपदकाचीही मानकरी! प्रवीण कुमारचीही रौप्य उंच उडी!

Next Post
tokyo

सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखारा ठरली कांस्यपदकाचीही मानकरी! प्रवीण कुमारचीही रौप्य उंच उडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!