Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

क्रीडा थोडक्यात: १) मार्च महिन्यात होणाऱ्या विश्व बीच व्हॉलिबॉल स्पर्धेवर जर्मनीच्या महिला संघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बीच व्हॉलिबॉलमध्ये महिला खेळाडू बिकिनी घालतात. बिकिनी घालण्यास मनाई केल्यामुळे बीच व्हॉलिबॉल स्टार कार्ल बॉर्गर आणि ज्युलिया स्यूड यांनी स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कतार हा एकमेव असा देश आहे, जिथे खेळाडूंना कोर्टवर बिकिनी घालण्यास मनाई आहे, असे या दोघींचे मत आहे. २) मोटेरा स्टेडियममध्ये पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीची आशा बाळगण्यात येत आहे; पण भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मते, इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवस-रात्र कसोटीत वेगवान गोलंदाजांची भूमिकाही फिरकीपटूंप्रमाणेच महत्त्वाची असेल. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत उभय संघ १-१ ने बरोबरीत आहे आणि बुधवारपासून येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी नव्याने तयार करण्यात आलेल्या स्टेडियमची नवी खेळपट्टी चर्चेचा केंद्रबिंटू ठरली आहे. ३) कर्णधार श्रेयस अय्यरने (९९ चेंडूंत नाबाद १०३ धावा) साकारलेले दिमाखदार शतक आणि अनुभवी धवल कुलकर्णीच्या (५/४४) भेदक गोलंदाजीमुळे मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी महाराष्ट्राचा सहा गडी आणि १६ चेंडू राखून सहज धुव्वा उडवला. जयपूरच्या के. एल. सैनी मैदानावर झालेल्या ‘ड’ गटातील या सामन्यात महाराष्ट्राने दिलेले २८० धावांचे लक्ष्य मुंबईने ४७.२ षटकांत चार फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. सलग दुसऱ्या विजयामुळे मुंबईने आठ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले आहे. ४) इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरणार आहे. कारण तो त्याचा १००वा कसोटी सामना आहे. या शिवाय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे. मोटेरा मैदानावर होणाऱ्या कसोटीत विजय मिळवल्यास कर्णधार म्हणून विराटने मिळवलेला २२वा विजय असेल. सध्या भारतात कसोटीत सर्वाधिक २१ विजयाचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.

PNB

पंजाब नॅशनल बँकेत रोजगार संधी, १६ जागांसाठी शिपाई भरती

मुक्तपीठ टीम   पंजाब नॅशनल बँकेत शिपाईपदाच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या...

DRDO

गोदरेज समूह बनवणार सीमा सुरक्षित ठेवणारे भुसुरुंग पेरणारे यंत्र

मुक्तपीठ टीम   गोदरेज समुहातील ‘गोदरेज प्रीसिजन इंजिनिअरिंग’ला संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडीओ प्रयोगशाळेकडून ‘मेकॅनिकल माईन लेयर, सेल्फ प्रॉपेल्ड’ या यंत्राच्या तंत्रज्ञान...

narmada

नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या गावात बालमेळ्यानं फुलवला आनंद

मुक्तपीठ टीम नर्मदा जीवनशाळांचा बालमेळावा कार्यक्रमाचा नुकताच मेधाताईंसह अन्य मान्यवरांच्या हस्ते समारोप झाला. या बालमेळ्यात नर्मदा खोऱ्यातील नर्मदा जीवन शाळेचे...

mahindra

दातृत्वाचा आनंदोत्सव…कचरा वेचक गायकांना महिंद्रांची मदत

मुक्तपीठ टीम   महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. महिंद्रा त्यांच्या ट्रविटर अकाऊंटवरून ते नेहमी...

sachin tendulkar

क्रिकेटचा देव सचिन कुणाचाही गुरु…मोफत ऑनलाइन कोचिंग

मुक्तपीठ टीम   क्रिकेटचा देव आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरला आता कोणीही आपला गुरू बनवू शकतो. सचिन तेंडुलकर...

hasan

“कमी खर्चातील आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार!”

मुक्तपीठ टीम   राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आयआयटी (मुंबई), रिलायन्स फाऊंडेशन आणि हुडको यांच्यामध्ये...

pm-kisan-samman

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार

मुक्तपीठ टीम   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे...

patanjali

रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ कोरोना औषध कार्यक्रमात जाणे आरोग्यमंत्र्यांना बाधले!

मुक्तपीठ टीम   पतंजलीच्या कोरोनावरील औषधावरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनावरील औषधाचे लॉन्चिंग करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन...

bjp Ashish shelar

“नवी मुंबई महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावांची हेराफेरी”

मुक्तपीठ टीम नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रारुप मतदार याद्यांमधे मोठ्या प्रमाणावर हेराफेरी, बनवाबनवी करण्यात आली असून मंत्रालयात केबीनमध्ये बसून हे केले...

Page 360 of 410 1 359 360 361 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!