Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे तीन पुरस्कार

केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

February 23, 2021
in घडलं-बिघडलं
0
pm-kisan-samman

मुक्तपीठ टीम

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाला देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्हयांना वेगवेगळया श्रेणींमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस २४ फेब्रुवारी २०२१ रोजी दोन वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणारे राज्य व निवडक जिल्ह्यांना येथील पुसा कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे कृषी मंत्री , कृषी विभागाचे सचिव तथा कृषी आयुक्त यांच्यासह, पुणे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

लाभार्थ्यांची भौतिक तपासणी व तक्रार निवारणात महाराष्ट्र अग्रेसर

 

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी ५ टक्के लाभार्थींची तपासणी करण्यासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यात ४,६८,७४७ शेतकऱ्यांची जिल्हा, तालुका व गाव निहाय यादी प्राप्त झाली होती. त्यातील ९९.५४ टक्के लाभार्थ्यांची भौतिक तपासणी पूर्ण करून राज्याने देशात उत्कृष्ट कार्य करत पहिला क्रमांक पटकाविला आहे.

तसेच राज्यात या योजनेसंदर्भात जवळपास ३८९९१ तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी २३६३२ तक्रारींचा अर्थात ६० टक्के पेक्षाही जास्त तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. म्हणून राज्यास देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुणे आणि अहमदनगर जिल्हयांचाही होणार सन्मान

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याने प्राप्त २२७८ तक्रारींपैकी २०६२ तक्रारींचा निपटारा करून आणि अहमदनगर जिल्ह्याने लाभार्थी भौतिक तपासणी अंतर्गत २८८०२ लाभार्थी पैकी सर्वच अर्थात १०० टक्के तपासणी पूर्ण करून देशात उल्लेखनीय काम केले म्हणून पुणे व अहमदनगर जिल्ह्यास पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत १.१४ कोटी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत नोंदणी केली असून आतापर्यंत साधारण १.०५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ११६३३ कोटी रुपये जमा झाले आहेत.


Tags: Maharashtrapuneकेंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरपुणे आणि अहमदनगरप्रधानमंत्री किसान सम्मान निधीमहाराष्ट्र
Previous Post

सांगलीत सत्तांतर…ऑनलाईन मतदानात भाजपा पराभूत, राष्ट्रवादीचा महापौर!

Next Post

“कमी खर्चातील आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार!”

Next Post
hasan

"कमी खर्चातील आपत्तीरोधक घरकुलांची निर्मिती करणार!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!