Rohini Thombare

Rohini Thombare

mumbai riksha driver

मुंबईचा रिक्षावाला…नातीच्या शिक्षणासाठी विकलं घर…लोकांनी केली लाखोंची मदत!

मुंबईत रिक्षा चालवणाऱ्या देशराज यांची कहाणी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. नातवंडांना शिकवण्यासाठी देशराज यांनी घर विकले. यानंतर,...

*मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी रसिकप्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला ‘हवा येऊ द्या’. या मंचावर अनेक कलाकार उपस्थित होते. नुकतेच या कार्यक्रमात लोकप्रिय मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला”मधील कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या भागात ओम आणि स्वीटूने अनेकांचं लक्ष वेधून घेतले आणि धम्माल केली. २) अभिनेत्री सारा अली खान सोशल मिडियावर कायम ऍक्टीव्ह असते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या बहिणीसोबतचा म्हणजेच इनायासोबतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोने तिच्या चाहत्यांचे जिंकले आहे. यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. ३) मराठी शो ‘बिग बॉस’ तसेच ‘रोडीज’सारख्या रिअॅलिटी शो मधून आपली ओळख निर्माण करणारा शिव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधणारा शिव अनेकदा त्याचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतेच त्याने ‘लोकल’ प्रवास करत तृतीयपंथीयांशी संवाद साधला. शिवचे हे फोटो चाहत्यांच्या फारच पसंतीस उतरत असून त्यावर ते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ४) सोशल मीडियावर सलमान खानच्या गाण्यांची आणि चित्रांची चर्चा होत असते. यावेळीदेखील सलमान त्याच्या चित्रकलेमुळे चर्चेत आला असून त्याने रेखाटलेलं एक चित्र बंगळुरुमधील कलाप्रदर्शनात ठेवण्यात आलं आहे. याविषयी एक पोस्ट शेअर करत सलमानने माहिती दिली आहे. ५) झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘रात्रीस खेळ चाले ३’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत त्यांनी “अण्णा नाईक… परत येणार!!! ‘रात्रीस खेळ चाले ३’ लवकरच…” असे कॅप्शन दिले आहे.

pregnancy care

बाळात लठ्ठपणा नको असेल तर गर्भवतींनी काय करावं?

गर्भवती महिलांनी गरोदरपणात अधिक काळजी घेतली पाहिजे. पाश्चात्य देशांमधील एक अभ्यासानुसार, जर गर्भधारणेदरम्यान आईचा आहार पौष्टिक नसेल तर त्याचा भविष्यात...

nitin gadkari

न्यायालयाने निवडणूक याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळल्याने गडकरींचे टेन्शन कायम

मुक्तपीठ टीम केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील निवडणूक याचिकेचं प्रकरण तसंच कायम राहणार आहे. गडकरींनी त्यांच्याविरोधातील निवडणूक याचिका फेटाळण्याची विनंती...

*मनोरंजन महत्त्वाचे*: 1) अभिनेत्री परिणीतीचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा नवीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातलं ‘मतलबी यारीयाँ’ हे गाणं परिणीतीने स्वतः म्हटलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिने याबद्दल माहिती दिली आहे. 2) ‘बिग बॉस’ १४ मधील गायक राहुल वैद सध्या चांगलाच चर्चेत आहे. राहुल वैद्यने या शोच्या माध्यमातून अनेकांची मनं जिंकली. राहुलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गर्लफ्रेंड दिशा परमारसोबत एक फोटो शेअर केला आहे. ते हेलिकॉप्टरमध्ये बसून एन्जॉय करताना दिसत आहे, त्यामुळेल सध्या ते चर्चेत आहेत. 3) अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टीव असते. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच रवीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिची मुलगी राशा थडानी हिच्या सोबतच फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. रवीनाची मुलगी राशाने तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी रवीनाने हे फोटो शेअर केले आहेत आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 4) ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगण देखील चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. चित्रपटात अजय आणि आलियाची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 5) अभिनेत्री सनी लिओनीची मुलगी निशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. या व्हिडीओमध्ये निशा वडिल डॅनियल वेबरला पाहून पळत त्यांच्याकडे जाते आणि त्यांना मिठी मारते. यामुळे सोशल मीडियावर याची भरपूर चर्चा आहे.

*मनोरंजन महत्त्वाचं*: १) मराठी अभिनयसृष्टीमधील अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांनी नुकतीच सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला असून ‘काल आमच्या दोघांमध्ये तिसरी आली’ असे कॅप्शन दिले आहे. ही तिसरी म्हणजे त्यांची नवी कार आहे. २) अभिनेत्री जान्हवी कपूरने सध्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोत परिधान केलेल्या ड्रेसने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. जान्हवीने परिधान केलेल्या या ड्रेसची खरी किंमत $३,८०० म्हणजेच २ लाख ७५ हजार २१७ रूपये इतकी आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे. ३) अतिशय लोकप्रिय असलेला शो ‘बिग बॉस १४’मध्ये राखी सावंतचा सहभाग होता. तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सवर उपचार घेत असल्याचे सांगितले. राखीने नुकताच तिच्या इन्स्टाकग्राम अकाऊंटवर आईसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई ज्यांनी कोणी मदत केली आहे त्यांचे आणि सलमानचे आभार मानताना दिसत आहे. ४) अभिनेता सोनू सूद हा त्याच्या वेगवेगळ्या कामगीरींनी नेहमीच चर्चेत असतो. आता सोनूने पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणाऱ्या ग्रामस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ५) आता यशोमान आपटे पहिल्यांदाच म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे. फुलपाखरू मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता यशोमान आपटे, ‘नको रुसवा नको दुरावा, सतत वाटे तू इथे जवळी रहा’ या नव्या म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे.

*मनोरंजन महत्त्वाचं* : 1) बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे काजोल आणि अजय देवगण यांच्या जोडीला आज २२ वर्ष पूर्ण होत आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या काजोल अजयच्या केमिस्ट्रीपेक्षाही खऱ्या आयुष्यात दोघांचं नात अधिक मजबूत आहे. त्यांना मुक्तपीठ तर्फे हार्दिक शुभेच्छा.. 2) सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेला एका मुलीचा ‘पावरी’ व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर ‘पावरी हो रही है’ हा ट्रेंड सुरु झाला. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच यात सहभाग घेतला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील पावरी हो रही है असे म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे. 3) अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेला दृश्यम २ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. चित्रपटाच्या सस्पेन्स आणि थ्रिलरचे खूप कौतुक होत आहे. क्रिकेटर आर अश्विनने हा चित्रपट पाहिल्यानंतर याबद्दल ट्विट केले, ज्यात मोहन लाल यांनी आभार मानले. 4) कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ सूरज पांचोली सोबत ‘टाइम टू डान्स’मध्ये झळकणार आहे, तिच्या पहिल्या लूकचे पोस्टर समोर आले आहे. 5) राखी सावंतची आई कर्करोगाशी झुंज देत आहे. तिने त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करा, असे तिने लिहिले आहे.

*मनोरंजन महत्त्वाचं* : 1. ‘मुंबई सागा’ हा गुन्हेगारी विश्वावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वावर अनेक चित्रपट बनले आहेत. आता त्या आधारित पुन्हा एक नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच समोर आली आहे. 2. अभिनेत्री करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर सोशल मीडियावर पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. आज करीनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3. सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘भूत पोलिस’चे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमात सैफसोबत, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार पाहाण्यास मिळणार आहेत. जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केले आहे. १० सप्टेंबरला हासिनेमा रिलीज होणार आहे. 4. सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन कपिल शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नुकतीच कपिल शर्माने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत विचारण्यात आले होते. त्यावर त्याने ‘माझी तब्बेत ठिक आहे. जीममध्ये वर्कआऊट करताना पाठिला दुखापत झाली आहे. मी काही दिवसांमध्ये ठिक होईन’ असे उत्तर दिले. 5. महाभारतातील एक वीर योद्धा कर्ण यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टायटल लोगो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता जॅकी भगनानी यानी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून हा लोगो शेअर केला आहे.

Page 291 of 295 1 290 291 292 295

ताज्या बातम्या

error: Content is protected !!