Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

Anil_Deshmukh

भाजपाचं आता नवं लक्ष्य: “गृहमंत्रीमहोदय, तुम्ही नेमकं केलं काय?”

मुक्तपीठ टीम सध्या महाराष्ट्रात सचिन वाझे अटक प्रकरण गाजतंय. सचिन वाझे, संजय राठोड यांच्याशी संबंधित पूजा चव्हाण आणि गृहखात्याशी संबंधित...

2000 rupee

आता दोन हजाराच्या नोटा चलनातून बाहेर जाणार?

मुक्तपीठ टीम देशात नोटाबंदीनंतर सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या होत्या. यामुळे काळा पैसा आणि बनावट नोटांना आळा बसेल...

क्रीडा थोडक्यात: 1) भारत आणि इंग्लंड यांच्यामधील ट्वेन्टी-२० मालिका सुरु असताना आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ट्वेन्टी-२० मालिकातील पाचपैकी दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडले आहेत. पहिल्या दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. पण उर्वरीत तीन सामन्यांसाठी गुजरात क्रिकेट संघटनेने प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. संघटनेच्या या निर्णयामुळे चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. 2) भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी १६ मार्च ही तारीख खूप खास आहे. १२ मार्च २०११ रोजी विश्वकरंडक स्पर्धेत सचिनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले ९९वे शतक केले होते. त्यानंतर अनेक सामने खेळल्यानंतरही सचिनला शतक करता आले नव्हते. शेवटी, बांगलादेशच्या मुशरफी मुर्तझाच्या चेंडूवर फटका खेळत सचिनची मोठ्या विक्रमाची प्रतीक्षा संपली. या सामन्यात सचिनने ११४ धावांची धमाकेदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा विक्रम आजही अबाधित असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची ख्याती आहे. 3) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या १५ वा सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका लीजण्डस संघाने बांगलादेश लीजण्डस संघावर १० गडी राखून मात मिळवली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या मालिकेच्या गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ पहिल्या स्थानावर असून इंडिया लीजण्डसचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. बांगलादेशवरील विजयामुळे आफ्रिकेने तिसरे स्थान मिळवले आहे. तर, इंग्लंड आणि वेस्ट इंडिंज यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर चौथ्या स्थानी कोण येणार, हे स्पष्ट होईल. 4) फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अन्नू राणी हिने नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. राणीने ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही. 5) भारताच्या पहिल्यावहिल्या अल्टिमेट खो-खो लीगचा थरार अनुभवण्यासाठी चाहत्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल २०१९मध्ये या लीगची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. परंतु काही कारणांनी खो-खो लीग पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता पुन्हा या स्पर्धेच्या आयोजनाकरिता महासंघाने पावले उचलली आहेत. देश-विदेशातील पुरुष खो-खोपटू आणि १८ वर्षांखालील मुलांच्या समावेशासह खेळवल्या जाणाऱ्या अल्टिमेट लीगच्या लढतींचे हिंदी, इंग्रजी भाषेतील समालोचनासह थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने खो-खो प्रेमींसाठी चांगली पर्वणी असणार आहे.

top 10 bulletin

#मुक्तपीठ मंगळवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com टॉप १० व्हायरल बातमीपत्र मंगळवार, १६ मार्च २०२१   महाराष्ट्रातील प्रत्येकाला लस द्या, उद्योगपती महिंद्रांची मागणी आर्थिक केंद्र...

sachin sawant fadnavis

सचिन वाझे प्रकरण: सीडीआरवरून काँग्रेसचा फडणवीसांना टोला

मुक्तपीठ टीम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटके असलेल्या गाडीच्या प्रकरणात आता राजकारण जास्तच पेटू लागले आहे. वादग्रस्त पोलीस...

गुन्हे महत्त्वाचे: 1)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्याच घरातील तब्बल ७ लाख ७८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. मतिन नूर कासम शेख असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनीच त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 2)एकतर्फी प्रेमातून कॉलेज युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे. लग्नासाठी नकार दिल्याने घरात घुसून माथेफिरु तरुणाने तरुणी आणि तिच्या आईवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 3) हडपसर गावातील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे. आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्यारे आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 4)केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी १५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. आतापर्यंत केडीएमसीचे ३७ अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. केडीएमसीमध्ये बांधकाम आणि बांधकामातून मिळणारा पैसा हा किती प्रमाणात वसूल केला जातो, हेच यातून उघड होत आहे 5)खर्चासाठी पाचशे रुपये न दिल्याचा राग आल्याने एकाने विश्रांतवाडीतील ‘शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक’ दुकानाच्या मालकावर रविवारी दुपारी एकच्या सुमारास कोयत्याने वार केले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

bank strike

१६ हजार ५०० कोटींचे चेक क्लिअर झाले नाहीत! बँक संपाचा फटका

मुक्तपीठ टीम केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (१५, १६ मार्च) दोन दिवसांचा...

mansukh hiren

अंबानी स्फोटके प्रकरणातील ‘ती’ मर्सिडिझ कुणाची?

मुक्तपीठ टीम मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणातले दररोजच गौप्यस्फोट होत आहे. २२...

kirit somiyya

सचिन वाझेंचं निमित्त…किरीट सोमय्यांकडून पवार-ठाकरे लक्ष्य!

मुक्तपीठ टीम अंबानी स्फोटके प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक झाल्यापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधक आणि ठाकरे...

anand mahindra

महाराष्ट्रातील प्रत्येकाला लस द्या, उद्योगपती महिंद्रांची मागणी

मुक्तपीठ टीम देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लस देण्यासाठी तातडीची परवानगी देण्याची मागणी उद्योगपती आनंद महिंद्रा...

Page 289 of 327 1 288 289 290 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!