Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाचं आता नवं लक्ष्य: “गृहमंत्रीमहोदय, तुम्ही नेमकं केलं काय?”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anil_Deshmukh

मुक्तपीठ टीम

सध्या महाराष्ट्रात सचिन वाझे अटक प्रकरण गाजतंय. सचिन वाझे, संजय राठोड यांच्याशी संबंधित पूजा चव्हाण आणि गृहखात्याशी संबंधित इतर प्रकरणांवरून भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपकडून गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. इतकचं नाही तर हिंगणघाटातील तरुणीच्या मृत्यूपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासह विविध घटनांचा हवाला देत भाजपाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना रोखठोक सवाल केला आहे.

सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीआधी, सचिन वाझे प्रकरणावरून गृहमंत्रीही बदलणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळून लावल्या. असं असलं तरी भाजपाने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाने राज्यात घडलेल्या काही गुन्हेगारी घटनांचा हवाला देत अनिल देशमुख यांना सवालही केले केले आहेत.

भाजपाचे नवे लक्ष्य…गृहमंत्री देशमुख
१. “एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्र्यांनी एकदाचं जाहीर कराव की तिला न्याय कधी मिळणार,” असा सवाल भाजपाने केला आहे.

 

एका तरुणीला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळले जाते, या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू होतो. घटनेला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र अजूनही दोषीवर कठोर कारवाई करण्यात आली नाही. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP तिला न्याय कधी मिळणार, हे एकदाचं जाहीर करावं. #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/62ghfrb9de

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021

२. “महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही गृहमंत्री अनिल देशमुख बोलले नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरत आहेत, हीच शोकांतिका!,” असं भाजपाने म्हटलं आहे.

 

महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीत निर्दोष साधूंची १०० जणांच्या जमावाकडून निर्घृण हत्या होते, मात्र त्यावर एक शब्दही आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP काढत नाहीत, कारवाई तर दूरच. मारेकरी अजूनही मोकाट फिरताहेत, हीच शोकांतिका ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/iMBwe4UXt6

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021

३. “माजी वनमंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो. त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे… मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल!,” असा टोला भाजपाने लगावला आहे.

 

मंत्री संजय राठोड पूजा चव्हाण या तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करतो, त्याचा फक्त राजीनामा घेतला जातो, मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे… मग या सर्व प्रकरणात गृहमंत्री @AnilDeshmukhNCP साहेब तुम्ही काय केलं? तुमचं कर्तव्य विसरलात की आठवण करून द्यावं लागेल ! #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/rpq2grUUVB

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021

४. “विकृत बुद्धीचा शर्जिल उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री अनिल देशमुख गाढ झोपेत आहेत,” असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे.

 

विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी शिवरायांच्या महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाविरुद्ध गरळ ओकतो. मात्र दुर्दैवाने गृहखातं त्याच्यावर कसलीही कारवाई करत नाही, कारण आपले गृहमंत्री @AnilDeshmukhNCP गाढ झोपेत आहेत. #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/kBcsCySrbP

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021

५ “सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?,” असा सवालही भाजपाने देशमुख यांना केला आहे.

 

सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष महिलेवर बलात्कार करून सुद्धा मोकाट फिरत आहे, मात्र गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांनी तो स्वतःच्या पक्षाचा असल्यामुळे कसलीही कारवाई केली नाही. हे असंच सुरू राहिलं तर आपल्या माता-भगिनी कशा सुरक्षित राहतील?#ResignAnilDeshmukh pic.twitter.com/1g38MQAt2U

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021

६.“रात्रंदिवस मेहनत करून पोलिसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही. मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का?,” असं म्हणत भाजपाने अनिल देशमुख यांच्या टीकास्त्र डागलं आहे.

 

रात्रंदिवस मेहनत करून पोलीसांत भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांच्या वाट्याला निराशाच… पोलीस भरतीबाबत कसलीही घोषणा नाही, मुलांच्या भविष्याशी खेळ चालला आहे. गृहमंत्रीसाहेब, तुमच्या बेजबाबदारपणामुळे या मेहनत करणाऱ्या मुलांनी जीव द्यावा का? #ResignAnilDeshmukh pic.twitter.com/tG3SISuHvq

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 16, 2021

७. अंबानी स्फोटकं प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनीही देशमुख यांचा राजीनामा घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने अनिल देशमुखांकडेच गृहखाते राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.


Tags: anil deshmukhBJPcm uddhav thackerayNCPअनिल देशमुखभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

“मराठा आरक्षणप्रकरणी चंद्रकांत पाटलांनी खोटं बोलून दिशाभूल करू नये!”

Next Post

नगरमध्ये भाजपाच्या पिचडांना धक्का, कट्टर समर्थकांनी बांधले घड्याळ!

Next Post
ajit pawar

नगरमध्ये भाजपाच्या पिचडांना धक्का, कट्टर समर्थकांनी बांधले घड्याळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!