Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१६ हजार ५०० कोटींचे चेक क्लिअर झाले नाहीत! बँक संपाचा फटका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bank strike

मुक्तपीठ टीम

केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात सुमारे १० लाख बँक कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (१५, १६ मार्च) दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपामुळे बँकांच्या शाखांमधून चालणाऱ्या व्यवहारांवर परिणाम झाला आहे. एका अंदाजानुसार सोमवारी पहिल्या दिवसाच्या संपामुळे किमान १६ हजार ५०० कोटी रुपयांचे चेक क्लिअर होऊ शकलेले नाहीत.

खासगीकरणाच्या विरोधात बँक कामगारांचा देशव्यापी संप आज दुसर्‍या दिवशीही सुरु आहे. या संपात देशभरातील जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाल्याने सोमवारी पहिल्याच दिवशी सरकारी बँकांची सेवा कोलमडली. मुंबईसह प्रमुख शहरात सार्वजनिक बँकांची कार्यालये संपामुळे ओस पडली होती. संपाच्या पहिल्याच दिवशी बँकिंग ऑपरेशन पूर्ण ठप्प झाले. संपामुळे बँकांमध्ये रोख रक्कम जमा झाली नाही, पैसेही काढले नाहीत. संपामुळे चेक क्लिअरिंगचे काम होऊ शकले नाहीत.

बँकांमध्ये या सेवा ठप्प आहेत

  • पैशांचा थेट व्यवहार नाही
  • पैसे जमा नाही झाले ना थेट काढले गेले
  • कर्ज प्रक्रिया झाली नाही
  • एनईएफटी, आरटीजीएस, परकीय चलन पूर्ण झाले नाही

एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीओसी, एनओबीडब्ल्यू आणि एनओबीओ या नऊ संघटनांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने म्हणजेच यूएफबीयूने दोन दिवसांचा संप पुकारला आहे.

बँक संघटनांचे म्हणणे आहे की संपामुळे चेन्नई, मुंबई आणि दिल्ली या तीन राष्ट्रीय ग्रिडमधील तब्बल १६,५०० कोटीचे चेकचे व्यवहार होऊ शकले नाहीत. या व्यतिरिक्त बर्‍याच लोकांना अडचणीही आल्या. माहिती नसल्यामुळे बरेच लोक बँकेत गेले, पण त्यांना परत यावे लागले. तथापि, बँकांनी आपल्या ग्राहकांना व्यवहारासाठी डिजिटल माध्यम वापरावे, अशी माहिती यापूर्वीच दिली होती.

बँकांचा संप किती मोठा?

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी, विदेशी, प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपामध्ये सहभागी आहेत.
  • महाराष्ट्रातील दहा हजारांपेक्षा जास्त शाखांमधील अंदाजे पन्नास हजार बँक अधिकारी आणि कर्मचारी दोन दिवसांच्या संपात सहभागी आहेत.
  • अधिकारी-कर्मचारी संपावर जात असलेल्या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात.
  • सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून संपाची सुरुवात झाली.
  • आज मंगळवार, १६ मार्च रोजी रात्री बारापर्यंत बँकांचे कामकाज बंद राहील.
  • बँकांच्या संपात सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी आहे, असा दावा अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी केला आहे.

Tags: bank strikeचेक क्लिअरिंगबँकांचा संपयुनायटेड फोरम ऑफ बँक युनियन
Previous Post

अंबानी स्फोटके प्रकरणातील ‘ती’ मर्सिडिझ कुणाची?

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्याच घरातील तब्बल ७ लाख ७८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. मतिन नूर कासम शेख असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनीच त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 2)एकतर्फी प्रेमातून कॉलेज युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे. लग्नासाठी नकार दिल्याने घरात घुसून माथेफिरु तरुणाने तरुणी आणि तिच्या आईवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 3) हडपसर गावातील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे. आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्यारे आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 4)केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी १५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. आतापर्यंत केडीएमसीचे ३७ अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. केडीएमसीमध्ये बांधकाम आणि बांधकामातून मिळणारा पैसा हा किती प्रमाणात वसूल केला जातो, हेच यातून उघड होत आहे 5)खर्चासाठी पाचशे रुपये न दिल्याचा राग आल्याने एकाने विश्रांतवाडीतील ‘शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक’ दुकानाच्या मालकावर रविवारी दुपारी एकच्या सुमारास कोयत्याने वार केले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)तुर्भे सेक्टर-२१ भागात राहाणाऱ्या एका तरुणाने आपल्याच घरातील तब्बल ७ लाख ७८ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. मतिन नूर कासम शेख असे या तरुणाचे नाव असून त्याच्या वडिलांनीच त्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एपीएमसी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. 2)एकतर्फी प्रेमातून कॉलेज युवतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसईतील एव्हरशाईन परिसरात ही घटना घडली आहे. लग्नासाठी नकार दिल्याने घरात घुसून माथेफिरु तरुणाने तरुणी आणि तिच्या आईवर चाकू हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी आणि तिची आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे. 3) हडपसर गावातील सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे. आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हत्यारे आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 4)केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना बांधकाम प्रकरणी १५ हजार रुपयांची लाच घेताना ठाणे एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. यामध्ये प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे आणि त्यांचे सहकारी सुहास मढवी यांचा समावेश आहे. आतापर्यंत केडीएमसीचे ३७ अधिकारी लाच घेताना पकडले गेले आहेत. केडीएमसीमध्ये बांधकाम आणि बांधकामातून मिळणारा पैसा हा किती प्रमाणात वसूल केला जातो, हेच यातून उघड होत आहे 5)खर्चासाठी पाचशे रुपये न दिल्याचा राग आल्याने एकाने विश्रांतवाडीतील 'शांती हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक' दुकानाच्या मालकावर रविवारी दुपारी एकच्या सुमारास कोयत्याने वार केले. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!