मुक्तपीठ टीम
ज्याप्रमाणे स्मार्जफोन वारणे हा एक जीवनातील भाग बनला आहे त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप वापरणे काळाची गरज बनला आहे. आपण सर्वजण व्हॉट्सअॅप वापरतो. व्हॉट्सअॅपने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांशी कनेक्ट केले आहे. त्यामुळे काय घडलं, कोण कुठे गेलं हे सहज मेसेज, स्टेटस किंवा व्हिडीओ कॉलद्वारे समजते. परंतु, व्हॉट्सअॅप सुरुवातीपासून असे नव्हते. पूर्वी या अॅपमध्ये आजच्याइतकी सुविधा उपलब्ध नव्हती. कालांतराने व्हॉट्सअॅपमध्ये बरेच बदल झाले आहेत.
व्हॉट्सअॅप सध्या नवनवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. आताही जे फिचर आणणार आहे त्याचा फायदा स्टेटस शेअर करताना होणार आहे. यामुळे सहज आणि सोप्या पद्धतीने स्टेटस शेअर करता येणार आहे.
व्हॉट्सअॅप ऑडिओ स्टेटस फिचर आहे तरी कसं?
- व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर लॉंच केल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर आपल्या आवाजात ऑडिओ स्टेटस शेअर करू शकाल.
- आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या फक्त व्हिडिओ, लिंक, मजकूर आणि फोटो स्टेटस शेअर केले जाऊ शकतात.
- हे फिचर लवकरात लवकर आणण्यासाठी कंपनी आपली बीटा चाचणी देखील करत आहे.
- हे फिचर सर्वात आधी आयओएससाठी रिलीज केले जाईल आणि त्यानंतर हे फिचर अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील उपलब्ध होईल.
व्हॉट्सअॅप ऑडिओ स्टेटस फीचर ३० सेकंदांचा असणार
- हा फिचर लॉंच केल्यानंतर, केवळ मजकूर, व्हिडिओ, लिंक्स आणि फोटो शेअर करू शकणार नाही, तर ३० सेकंदांपर्यंत ऑडिओ स्टेटसही शेअर करू शकाल.
- प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडीओची लांबी फक्त ३० सेकंदाची असावी.
ऑडिओ स्टेटस ठेवण्यासाठी काय करावे?
- हे फिचर वापरण्यासाठी स्टेटस पेजवर दिलेल्या मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला ऑडिओ फाइल अपलोड करण्याचा आणि व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिसेल.
- जर पाहिजे असल्यास, आपण ऑडिओ स्टेटससह मजकूर नोट देखील ठेवू शकता.