Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडोपासून रितेश देशमुख दूर राहिले, तरी चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागले!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ritesh And Genelia

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडमधील स्टार अभिनेत रितेश विलासराव देशमुख हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून दूर राहिले. देशातील काही अभिनेते, अभिनेत्री राहुल गांधींच्या यात्रेत खांद्याला खांदा भिडवून सहभागी झाले आणि काँग्रेसच्या चांगल्या दिवसांमध्ये सत्ता उपभोगलेल्या देशमुख घराण्यातील रितेश सहभागी न झाल्याने टीका होत होती. मात्र, तसं केल्यानंतरही त्यांच्यामागील सत्तासंकट काही टळलेलं नाही. सहकार मंत्री अतुल सावे यांनी रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसोझा यांच्या कंट्री अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरूद्ध लातूर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने ११६ कोटींच्या कर्जाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

देशमुखांच्या एमआयडीसी भूखंडाच्या चौकशीचे आदेश

  • दोघांना एप्रिल २०२१ मध्ये लातूरमध्ये एमआयडीसी प्लॉट देण्यात आला.
  • एलडीसीसीबीने त्यांना ऑक्टोबर २०२१ मध्ये कर्ज दिले आणि ऑक्टोबर २०२१ आणि जुलै २०२२ मध्ये २ इंस्टॉलमेंटमध्ये दिले.
  • बँकेच्या निधीबाबत असा दावा केला जात आहे की, त्यामध्ये आवश्यक नियम पाळले गेले नाहीत.
  • अतुल सावेंनी सहकारी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना सांगितले की, रितेशचा भाऊ अमित देशमुख मागील एमव्हीए सरकारचे मंत्री होता तर लहान भाऊ कॉंग्रेसचे आमदार धीरज देशमुख एलडीसीसीबीचे अध्यक्ष होते.
  • सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे कार्यक्षेत्र केवळ निधीपुरते मर्यादित आहे.
  • डिप्टी जिल्हा निबंधक कर्जाच्याबदल्यात पुरेशी सुरक्षा सुनिश्चित केली गेली आहे की नाही आणि काही बेकायदेशीरपणा आहे की नाही याची तपासणी करेल.
  • अहवाल आल्यानंतर पुढे केलेल्या कारवाईचा विचार करू.

“भाजपा नेत्यांनी केलेले आरोप चुकीचे”

  • जमीन वाटप आणि बँक निधीचा व्यवहार झाला कारण रितेशचा राजकीय संबंध आहे, असा पत्रात आरोप आहे.
  • वाटप आणि निधी तपासून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
  • दोन आठवड्यांपूर्वी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष गुरुनाथ मंगा आणि उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप यांनी पत्र लिहिल्यानंतर सरकार सक्रिय झाले आहे.
  • याबद्दल रितेश देशमुख यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
  • गेल्या महिन्यात, त्यांच्या कंपनीने स्पष्ट केले होते की, भाजपाच्या नेत्यांनी केलेले हे आरोप चुकीचे आहेत.
  • एमआयडीसीने नियमानुसारच भूखंड, बँकेने कर्ज वाटप केले आहे.

Tags: Atul SaveGenelia D SouzaMaharahstraRitesh Deshmukhकंट्री अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडरितेश देशमुखसहकार मंत्री अतुल सावे
Previous Post

व्हॉट्सअॅपवर स्टेटस शेअर करण्यासाठी आता ऑडियो पर्याय मिळणार!

Next Post

कोण आहेत आधुनिक गेमिंगचे जनक जेराल्ड जेरी लॉसन? गुगलने डूडल बनवून आठवणींना केले ताजे…

Next Post
Know whoi is Who is Gerald Jerry Lawson

कोण आहेत आधुनिक गेमिंगचे जनक जेराल्ड जेरी लॉसन? गुगलने डूडल बनवून आठवणींना केले ताजे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!