Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“उचलली जीभ लावली टाळ्याला” छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत – अजित पवार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ajit Pawar

मुक्तपीठ टीम

उदाहरण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेता हेच चुकीचे आहे. ‘या’ उदाहरणाची आणि ‘त्या’ उदाहरणाची तुलनाच होऊ शकत नाही. उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं चालेल… छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज प्रदेश कार्यालयात आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आग्रात ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवले त्याची आणि शिंदेच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. यांना कुणी बंदी केले होते असा सवाल करतानाच एकनाथ शिंदे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आज आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा आणि नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अधिवेशनात काम करणार असल्याची माहिती पवारसाहेबांना दिली असेही अजित पवार म्हणाले.

याशिवाय आता तातडीने घडणाऱ्या घटना त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये, सीमावाद प्रकरण, पीकविमा यावरही चर्चा झाली. या सगळ्या गोष्टींचा आदरणीय शरद पवारसाहेबांना अनुभव असल्याने त्यांनी यावर मार्गदर्शन केले.

६ डिसेंबर रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत होणार असून या बैठकीमध्ये शेतकरी दिंडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित का नव्हते याची कारणेही अजित पवार यांनी सांगितली.


Tags: ajit pawarChhatarapati Shivaji MaharajMaharashtraMangalprabhat Lodhaअजित पवारमहाराष्ट्र
Previous Post

गनिमी कावा आणि फितुरी यातला फरक संजय गायकवाड यांना कळतो का- महेश तपासे

Next Post

व्हॉट्सअॅपवर स्टेटस शेअर करण्यासाठी आता ऑडियो पर्याय मिळणार!

Next Post
whatsupppp

व्हॉट्सअॅपवर स्टेटस शेअर करण्यासाठी आता ऑडियो पर्याय मिळणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!