Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“मनसुख हिरन यांच्या तोंडावरील रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब!”

भाजपा नेते आशिष शेलार यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

 

मनसुख हिरन यांचा मृतदेह ज्यावेळी सापडला त्यावेळी त्यांच्या तोंडावर सफेद रुमाल असल्याचे सर्वांनीच पाहिले होते मात्र हे रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब झाल्याचे उघड करीत भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हिरन यांच्या केसमधील अनेक पुरव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. तसेच या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलीस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी एनआयए ने करावी, अशी मागणी यावेळी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

मनसुख हिरन यांच्या केसमधील अनेक कागदपत्रे उघड करीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ही केस दाबण्यासाठी सरकारमधील कोण मंत्री काम करीत होते, असा सवाल उपस्थित केले आहेत. आज वांद्रे पश्चिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महाराष्ट्रात गेले काही दिवस जे सुरू आहे त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला द्यावी लागणार आहेत. कारण अनुत्तरीत प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे. कारण हे प्रश्न आपल्या कु कृत्यामुळे ठाकरे सरकारमधील अधिकारी निर्माण करीत आहेत.

मनसुख हिरन यांच्या खूनाचे प्रकरण आता एनआयएकडे गेले आहे. पण एनआयएकडे जाण्याआधी याप्रकरणी ठाकरे सरकार ही केस एनआयएकडे देण्यास तयार नव्हती. न्यायालयातून आदेश आल्यानंतर सुध्दा ही केस ठाकरे सरकार एनआयएकडे देण्यास तयार होत नव्हते. वारंवार केंद्रीय गृह सचिवांनी या केसमधील कागदपत्रांची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली पण तरीही हे सरकार कागदपत्रे देण्यास तयार नव्हते. शेवटी ठाण्याच्या न्यायालयाने निर्देश दिले त्यामुळे ठाकरे सरकारसमोर अन्य पर्यायच उरला नाही. त्यावेळी ही कागदपत्रे एटीएसकडून एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आली. या प्रकरामुळे सवाल हा उपस्थितीत होतो की राज्य सरकार मनसुख हिरन यांची केस आपल्याकडेच का ठेवू पाहत होते. त्याचे उत्तर स्पष्ट आहे की, मनसुख हिरन यांच्या खुनाच्या केसमध्ये राज्य सरकारमधील मंत्री, नेते, अधिकारी मिळून एक मोठे षडयंत्र रचून या केसमधील पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे, तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करीत होते.

 

आमदार श्री. आशिष शेलार यांची पत्रकार परिषद https://t.co/0JoZjhZuNI

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 26, 2021

 

मनसुख यांचे शव जेव्हा मुंब्राच्या खाडीत सापडले त्यावेळी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मनसुख यांच्या तोंडावर रुमाल होते. मात्र त्यांच्या शवविच्छेदन अवालामध्ये मृतदेहासोबत सापडलेलया वस्तुंची जी नोंद आहे त्यामध्ये या रुमालांची नोंद नाही हे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अहवालच उघड करून आज मीडियासमोर आणले. मग हा महत्वाचा पुरवावा पोलीसांनी कुणाच्या सांगण्यावरून नष्ट केला असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यानी केला.
मनसुख यांच्यासारख्या केसमध्ये शवविच्छेदन करताना राष्ट्रीय मनावायोगाच्या नियमाप्रमाणे संपुर्ण चित्रण करावे लागते. या शवविच्छेदनासाठी दोन तास लागले. पण प्रत्यक्षात यातील एक एक मिनिटाच्या सात ते आठ क्लिप व्हिडीओ का बनविण्यात आल्या. संपुर्ण चित्रण का करण्यात आले नाही. डॉक्टरांना तसे आदेश कोणी दिले होते. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी पुरव्यांशी छेडछाड कुणाच्या सांगण्यावरून केले तो मंत्री कोण तो नेता कोण असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला.

ज्यावेळी मृतदेहाच्या फुफुसामध्ये पाणी सापडले तर त्या पाण्याची डायटोम टेस्ट करणे आवश्यक होते. हिरेन यांच्या शरिरात पाणी सापडले नाही तरी मग त्यांचे अवयव डायटोम टेस्टसाठी का पाठवण्यात आले. ही टेस्ट जे जे रुण्णालयात होत नाही तशी परवानगी या रूग्णालयाला नाही तरीही मनसुख यांचे अवयव जे जे रूग्णालयात का आणण्यात आले. जे जे रूग्णालयातील डॉक्टरांनी आम्ही फक्त अवयावंचे स्कँनिग केले, टेस्ट करण्यात आली नाही असे सांगितले. तर मग या अवयावयांची छेडछाड करण्यासाठीच ते जे जे रुग्णालयात आणण्यात आले होते का असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी करीत मनुसख हिरन यांनी आत्महत्या केली हे दाखवण्यासाठी ही डायटोन टेस्ट करण्याचा घाट घालण्यात आला असा आरोपही त्यांनी केला आहे.

जेव्हा हे प्रकरण एटीएसकडे गेले त्यावेळी एटीएसला लक्षात आले की, या प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेले रुमाल गायब आहेत, शवविच्छेदनाचे संपुर्ण चित्रीकरण नाही, तसेच डायटोम टेस्ट नाही, त्यासाठी आवश्यक असलेले अवयव उघडण्यात आले आहेत त्यांच्याशी छेडछाड करण्यात आली आहे त्यामुळे कर्तबगार एटीएसने या प्रकरणी छापे मारून पुरावे गोळा करण्याचे निश्चित करण्यात आले त्यासाठी आवश्यक असलेले शासकीय पंचांना २० मार्चला बोलावून सहा विविध ठिकाणी छापे मारण्याचे एटीएसने ठरवले. त्यासाठीची तयारी पुर्ण केली. सहा गट तयार करण्यात आले पण चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत एटीएसला छापेमारी करण्याची परवागी सरकारने दिली नाही. त्यानंतरही छापेमारी करू दिली नाही. एटीएसला छापेमारी करून पुरावे गोळा करण्यास कोणी रोखले. त्याचे निर्देश कोणत्या मंत्र्यांनी दिले. असा सवाल आमदार अॅड आशिष शेलार यांनी केला.

स्थानिक पोलीसांना काम करू दिले नाही. जे केले ते चुकीचे केले. पुराव्यात छेडछाड करण्यात आली. एटीएसला छापेमारी करू दिली नाही. म्हणून राज्य सकारला ही केस एटीएसकडून एनआयएकडे द्यायची नव्हती. म्हणून एनआयए ने या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलिस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी एनआयए करावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

 

कुंटेचा तो अहवाल प्रभादेवीच्या मुख्यपत्र कार्यालयातून

एक दिवस आधी चौकशीची मागणी केली जाते आणि रश्मी शुक्ला यांच्या प्रकरणी दुसऱ्या दिवशी सीताराम कुंटे चौकशी अहवाल सादर करतात. हा अहवाल पण व्हाईट वॉश लावणाराच आहे. आपले काळे झाकण्यासाठी पांढरारंग लावण्याचा प्रकार आहे. हा अहवाल पाहिल्यावर लक्षात येईलकी या अहवालाची निमिर्ती प्रभादेवीच्या मुख्यपत्राच्या कार्यायातून झाली आहे.

 

सरकारची कमिटी व्हाईट वॉश लावण्यासाठीच

जेव्हापासून राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाले आहे तेव्हापासून प्रत्येक विषयात जनतेची दिशाभूल करण्यात येते आहे. मनसुख हिरन यांच्या केसमध्ये तर हे वारंवार दिसून आले आहे. प्रथम सचिन वाझेला वाचविण्याचा प्रयत्न झाला मग गाडीचा तपास एनआयए करू लागल्यावर मनसुख यांची केस एनआएकडे देण्यास नकार देण्यात आला. त्यातील पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली. त्यामुळे ठाकरे सरकारची सुरुवाती पासूनची भूमिका पाहता हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप करीत आमदार अॅड आशिष शेलार यांनी राज्य सरकारने गृहमंत्री अनिल देशमुख यांचीचौकशी करण्यासाठी नियुक्त केलेली निवृत्त न्यायमुर्तीची कमिटी म्हणजे नेरोलेक्सचा व्हाईट वॉश लावण्यासाठीच आहे अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडविली आहे. परमविर सिंग यांनी केलेल्या आरोपातून अनिल देशमुख यांना क्लिन चिट देण्यासाठी ही कमिटी गठीत करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

 

देशमुख यांनी सीबीआय चौकशीची मागणी करावी

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत. अशी भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंडळी आहे. मग त्यांनी याबाबतच्या याचीकेवर आपले प्रतिज्ञापत्र सादरकरून सीबीआय चौकशीची मागणी करावी. असा टोला आमदार अॅड आशिष शेलार यांनी लगावला.

 

बंदा नवाज काँग्रेसचा कार्यकर्ता

२०१७ ला सुध्दा पोलीस दलातील बदल्यांसाठी एक रॅकेट कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी त्यांचा बिमोड झाला. त्यावेळी २०१७ मध्ये एफआयआर दाखल झाले तेच आरोपी पुन्हा या रॅकेटमध्ये सक्रीय झाल्याचे दिसून येते आहे. या रॅकेट मधील एकआरोपी बंदा नवाज हा का २०१७ च्या केसमध्ये आरोपी आहे. तो काँग्रेसचा कार्यकर्ता असून २०१७ च्या केसमध्ये त्याला अटक होऊ नये तसेच त्याला वाचवता यावे म्हणून कुंटे यांनी दिलेला अहवाल उपयुक्त ठरणार आहे. या निमित्ताने या केसमध्ये एक त्रिकोण पुर्ण झाले आहे. शिवसेनेशी संबंधित सचिन वाझे तर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि आता काँग्रेसचा बंदा नवाज असे तिन्ही पक्षांचे चेहरे समोर आले आहेत, असा आरोपही आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला.


Tags: ashish shelarchief minister uddhav thackerayमनसुख हिरनसचिन वाझे
Previous Post

ट्रॅफिक पोलिसाची चुकीची कारवाई, पुणेकराने मागे घ्यायला लावली!

Next Post

एलआयसीने आणली नवीन पॉलिसी, जाणून घ्या.

Next Post
lic

एलआयसीने आणली नवीन पॉलिसी, जाणून घ्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!