मुक्तपीठ टीम
भारतीय क्रिकेट बोर्डाने सोमवारी जम्मू-काश्मीर आणि बिहार या दोन राज्यांच्या क्रिकेट संघटनांसाठी दोन नव्या नियुक्ती केल्या. या नियुक्त्या त्या राज्यांमधील क्रिकेटची स्थिती सुधारण्यासाठी करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या दोन नवीन नियुक्त्यांची माहिती दिली. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे.
शेलारांवर नवी जबाबदारी!
- बीसीसीआयने आशिष शेलार यांची जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
- आशिष शेलार हे भारतीय जनता पक्ष मुंबईचे अध्यक्ष आहेत.
- २०१४ आणि २०१९ मध्ये वांद्रे पश्चिममधून महाराष्ट्र विधानसभेचे आमदारपदी निवडून गेले आहेत.
- आशिष शेलार हे बीसीसीआयचे कोषाध्यक्षही आहेत.
- तर देवजीत सैकिया यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- देवजीत सध्या बीसीसीआयचे सहसचिव आहेत.
- ते एक वकील आहेत.
- यापूर्वी ते आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि प्रथम श्रेणी स्तरावरील क्रिकेटपटू देखील होते.