Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दाऊद पाकिस्तानातून मुंबईतील कुटुंब कसं चालवतो?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dawood Ibrahim

मुक्तपीठ टीम

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गेली अनेक दशकं परागंदा आहे. १९९३च्या बॉम्बस्फोटाच्या देशद्रोही घातपातानंतर तर तो पाकिस्तानातही समोर येत नाही. अशा या फरार आरोपीचं भारतातील कुटुंब कसं चालतं, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, आता आता ईडीच्या चौकशीत समोर आलेली नवी माहिती दाऊदच्या कुटुंबाचा खर्च कसा भागवला जातो, ते स्पष्ट करणारी आहे. दाऊद आपल्या कुटुंबाला दर महिन्याला दहा लाख रुपये पुरवतो. ते त्याच्या कुटुंबाकडे पोहचवले जातात. दाऊदच्या भावानेच ती रोकड दाखवत माहिती दिल्याचं एका साक्षीदारानं ईडीला सांगितलं आहे.

नवाब मलिक यांच्याविरोधात सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीदरम्यान साक्षीदार खालिद उस्मान शेख याने ईडीला महत्त्वाची माहिती दिली.त्यात खालिदने ही महत्वाची माहिती उघड केली. इक्बाल कासकरने आपल्याला दाऊदने पाठवलेली रोकड दाखवल्याचंही तो म्हणाला.

खालिद उस्मान शेखनं उघड केला दाऊदच्या कुटुंबाचा खर्च!

  • साक्षीदार खालिद उस्मान शेख याने ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले, इक्बाल कासकरने त्याचा मोठा भाऊ दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं सांगितले.
  • इतकेच नाही तर दाऊद इब्राहिम प्रत्येक महिन्याला पाकिस्तानातून १० लाख रुपये आपल्या नातेवाईकांसाठी पाठवत असल्याचं ईडीच्या चौकशीत समोर आलं आहे.
  • खालिदच्या म्हणण्यानुसार, इक्बाल कासकरने असेही सांगितले होते की दाऊद हे पैसे त्याच्या एका माणसामार्फत पाठवतो. त्यालाही दरमहा दहा लाख रुपये मिळतात.
  • खालिद उस्मान शेख याने पुढे म्हटले, इक्बाल कासकर याने पैसेही दाखवले आणि हे पैसे दाऊद भाऊकडून आल्याचंही त्याने सांगितले.

दाऊदच्या नावावर लोकांकडून पैसे उकळत करतात वरकमाई!

  • खालिद उस्मान शेखचा भाऊ, इक्बाल कासकर हे बालपणापासून मित्र आहेत.
  • खालिदचा भाऊ एका टोळीयुद्धात मारला गेला होता.
  • तो दाऊदची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर होता.
  • सलीम पटेल हा हसीना पारकरचा बॉडिगार्ड होता.
  • लोक त्याला सलीम पटेल या नावाने ओळखत होते.
  • खालिदने ईडीला सांगितले की, एकदा सलीमने त्याला सांगितले होती की तो दाऊदचे नाव वापरुन हसीनासोबत पैसे उकळत आहे.
  • तसेच मालमत्ता सुद्धा हडप करत आहे.
  • एकप्रकारे दाऊदने कुटुंबासाठी दिलेल्या मासिक खर्चाशिवाय त्याचे कुटुंबीय त्याच्या दहशतीच्या जोरावर वरकमाईही करत असतात.

Tags: Dawood IbrahimEDmumbaiPakistanईडीदाऊद इब्राहिमपाकिस्तानमुंबई
Previous Post

कॅमेरा असो की स्मार्टफोन…पिक्सेल म्हणजे काय?

Next Post

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट! समीर वानखेडेंना आणखी एक धक्का!!

Next Post
Amir Khan Sameer Wankhede

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट! समीर वानखेडेंना आणखी एक धक्का!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!