मुक्तपीठ टीम
माजी निवृत्त आयएएस अरुण गोयल यांची शनिवारी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुशील चंद्र मे महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त पदावरून निवृत्त झालेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर गोयल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. गोयल यांच्या नियुक्तीची माहिती सरकारने एका पत्रकाद्वारे जारी केली. चला जाणून घेवूया ते कोण आहेत आणि आजवर त्यांनी कोणती कार्य बजावली आहेत…
नवे निवडणूक आयुक्त अरुण गोयल कोण आहेत?
- अरुण गोयल, १९८५ च्या बॅचचे पंजाब केडरचे अधिकारी होते.
- गोयल यांनी शुक्रवारपर्यंत अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव होते.
- २०१९ मध्ये अवजड उद्योग सचिव म्हणून नियुक्त होण्यापूर्वी गोयल हे सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव होते.
- त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
- गोयल यांनी यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी सेवेतून निवृत्त होणे अपेक्षित होते.
- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांच्यासह निवडणूक आयोगाचे ते भाग असतील.
गुजरात विधानसभा निवडणुक आधी आयुक्तपदाची नियुक्ती…
- गुजरातमध्ये विधानसभा निवडणुक जवळ असताना अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी निवडणुक होणार आहेत.
- हिमाचल प्रदेशची निवडणूक १२ नोव्हेंबरला पूर्ण झाली.
- दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल ८ डिसेंबरला लागणार आहेत.