मुक्तपीठ टीम
अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षांकरीता शासकीय वसतीगृहासाठी अर्ज केला आहे परंतु त्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभासाठी १५ डिसेंबर २०२२ पर्यत अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११वी, १२वी तसेच इयत्ता १२वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन भत्ता २५हजार, निवास भत्ता १२ हजार, तसेच निर्वाह भत्ता ६ हजार असे एकूण प्रति विद्यार्थी रक्कम ४३ हजार तसेच वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ५ हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बॅक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालीकेच्या हद्यीतील व हद्यीपासुन ०५ कि.मी. परिसरातील महाविद्यालयात शिकत असलेले विदयार्थी या योजनेस पात्र आहेत. (या व्यतिरीकत्त तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र नाहीत) विद्यार्थी अनुसुचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा. (जात प्रमाणपत्र आवश्यक)
या योजनेसाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेश घेण्यास पात्र असावा. दिव्यांग विद्यार्थ्यास (अनु.जाती व नवबौध्द घटकातील) 3% आरक्षण विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. अपुर्ण भरलेल्या व अपुर्ण कागदपत्रांसह सादर केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक, अधिक्षीका मुलींचे शासकीय वसतीगृह, विश्रामबाग, सांगली ०२३३-२३०४३६७ अधिक्षक मुलांचे शासकीय वसतीगृह, विश्रामबाग, सांगली ०२३३-२३०१४१४ किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सांगली जुना बुधगांव रोड, सामाजिक न्याय भवन, सांगली ०२३३-२३७४७३९ येथे संपर्क साधावा.